अभिनेत्री-निर्माती दिया मिर्झा प्रियकर साहिल सांघा याच्यासोबत पुढील वर्षी लग्नबंधनात अडकणार आहे. ” साहिल एक चांगला माणूस आहे. आम्ही पुढच्या वर्षी लग्न करणार आहोत,” असे दिया ओव्हसीस पुरस्कार समारंभावेळी म्हणाली.
बॉर्न फ्री एंटरटेनमेन्ट ही निर्माती कंपनी दिया, साहिल सांघा आणि झायेद खान यांच्या संयुक्त मालकीची आहे. यांच्या निर्मितीअंतर्गत २०११ साली ‘लव ब्रेकअप्स जिंदगी’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित केला असून याचे दिग्दर्शन साहिलने केले होते. दियाने नुकताच झालेल्या आयफा सोहळ्यामध्ये ‘बॉलिवूड वेडिंग सॉंग’वर नृत्य केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dia mirza to tie the knot next year