ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत असल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी दिली आहे. विक्रम गोखले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं रुग्णालयाने सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे. ते डोळे उघडत असून हात, पाय हलवत आहेत. पुढील ४८ तासात त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्टही निघू शकेल असं वाटत आहे. त्यांचा रक्तदाब आणि हदयाची क्रिया स्थिर आहे,” अशी माहिती शिरीष याडगीकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

गुरुवारी शिरीष याडगीकर यांनी श्वसनाचा त्रास होत असल्याने विक्रम गोखले यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आलं असून, प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळत असून विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dinanath mangeshkar hospital informs marathi actor vikram gokhale condition is improving sgy