बॉलिवूड कलाकार हे नेहमीच अलिशान आणि महागड्या गाड्यांचे चाहते असतात. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता इम्रान हश्मी, लोकप्रिय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टीने देखील Lamborghini ही महागडी कार खरेदी केली होती. आता या महागड्या यादीमध्ये आणखी एका अभिनेत्रीचे नाव नोंदवण्यात आले आहे. ते म्हणजे सर्वांची लाडकी आणि तितकीच लोकप्रिय अभिनेत्री दिशा पटाणी. दिशाने नुकताच नवी महागडी अशी कार घेतली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कारसोबतचा फोटो शेअर केला आहे.
दिशाने Range Rover Sport SUV ही कार खरेदी केली आहे. या कारची किंमत एक कोटी तीस लाख रुपये आहे. ही कार पॅट्रोलवर चालणारी आहे. Range Rover Sport SUV ही कार प्रती तास २०१ किमीचा पल्ला पार करते. तसेच ७.३ सेकंदमध्ये १०० किमीचा वेग ही कार पकडते.
बॉलिवूड कलाकारांमधील दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन, शाहरुख खान, संजय दत्त, सलमान खान, आलिया भट्ट अशा अनेक कलाकारांकडे रेंज रोवर कार असल्याचे पाहायला मिळते. बऱ्याच वेळा हे कलाकार कारसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आता या कलाकारांमध्ये दिशा पटाणीचा समावेश झाला आहे.
आणखी वाचा : डोक्यात गेली प्रसिद्धीची हवा, रानू मंडल यांचं वागणं बदललं
लवकरच दिशा अभिनेता आदित्य रॉय कपूरसह ‘मंगल’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकताच पूर्ण झाले आहे. हा चित्रपट २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे. या व्यतिरिक्त दिशा सलमानच्या ‘राधे’ चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.