‘ये रिश्ता या कहलाता है’ या मालिकेतून अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी घराघरात पोहचली. मालिकेनंतर रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’मधून दिव्यांकाचा बेधडक अंदाज पाहायला मिळाला. सध्या दिव्यांकाने छोट्या पडद्यावरून ब्रेक घेतला असला तरी ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. नुकताच दिव्यांकाने तिचा एक डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडीओवरून दिव्यांकाला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. तर दिव्यांकानेही बॉडी शेमिंगवरून ट्रोल करणाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिव्यांकाने नुकताच शेअर केलेल्या व्हिडीओत ती डान्सची मजा लुटताना दिसतेय. दिव्यांकाच्या या व्हिडीओवर मात्र काही नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. दिव्यांका गरोदर असल्याचं काही युजर म्हणाले तर काहींनी तिच्या पोटावर आणि लठ्ठपणावर कमेंट केल्या आहेत.

दिव्यांकाने ट्रोल करणाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली आहे. पोस्टमध्ये तिने लिहिलं, “मी काही कमेंट वाचल्या त्यामुळे मला हे लिहावं लागतंय. एका आदर्श स्त्रीच्या प्रतिमेप्रमाणे माझं पोट सपाट नाही आणि हे सत्य मान्य करा. पुन्हा मी गरोदर आहे का किंवा जाड आहे असे प्रश्न विचारू नका. पहिले मला हा व्हिडीओ डिलीट करावासा वाटला. पण नाही मी असं करणार नाही. त्यापेक्षा तुम्ही तुमची मानसिकता बदला.” असं दिव्यांका म्हणाली.

हे दखील वाचा: Video : “न्यूड फोटोशूटसाठी पुरस्कार मिळाला का?” रणवीर सिंगचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल


पुढे दिव्यांकाने ट्रोल करणाऱ्यांची कानउघडणी केली. “खरं तर मी फार लठ्ठ नसतानाही अनेकजण वाईट कमेंट करत आहे. त्यामुळे ज्यांना खरचं वजनासंबधी समस्या आहेत त्यांच्याशी तुम्ही कसे वागत असाल. संवेदनशीलता नसणाऱ्या या मूर्खांची लाज वाटते. खरं तर आधी हा व्हिडीओ मुक्तपणे नाचण्यासंबधीचा होता. मात्र आता तो मुक्तपणे जगण्याबद्दल आहे.” असं म्हणत दिव्यांकाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हे देखईल वाचा: “तुला तीन जणांसोबत…” करणने विचारलेल्या सेक्सबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर विजय देवरकोंडाचं धक्कादायक उत्तर

दिव्यांका कायम सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. ट्रोलर्सची बोलती बंद करण्याची दिव्यांकाची ही पहिली वेळ नव्हे. याआधी देखील दिव्यांकाने तिला ट्रोल करणाऱ्यांना शेलक्या शब्दांत उत्तर दिलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Divyanka tripathi slam who troll her for body shaming kpw