बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) मागच्या काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. रणवीरने ‘पेपर’ या इंग्रजी मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रणवीरवर जोरदार टीका झाली होती. अनेक कलाकार मंडळींनी यावर प्रतिक्रियाही दिली. आता रणवीरचा नव्या लूकमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – Video : पुणे विमानतळावर ‘पावनखिंड’ चित्रपट सुरु होता अन्…; प्रत्यक्ष बाजीप्रभु देशपांडेंचं घडलं दर्शन

Djokovic recipient of the Bonmati Laureate Award sport news
जोकोविच, बोनमती लॉरेओ पुरस्काराचे मानकरी
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: डगआऊटमधून रिव्ह्यूसाठी सूचना; टीम डेव्हिडचं ‘ब्रेनफेड मोमेंट’, पाहा VIDEO
a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
foreign girl looking for indian husband
VIDEO : “मला भारतीय नवरा पाहिजे” विदेशी तरुणी शोधतेय लग्नासाठी मुलगा, व्हिडीओ होतोय व्हायरल

एका पुरस्कार सोहळ्यासाठी रणवीरने हजेरी लावली होती. यादरम्यानचे त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये रणवीरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता तसेच पायजमा परिधान केला असल्याचं दिसत आहे. तसेच त्याने नेहरु जॅकेट परिधान केलं असल्याचंही यामध्ये दिसत आहे. इतकंच नव्हे तर त्याच्या हातात ट्रॉफी देखील दिसत आहे. न्यूड फोटोशूटनंतर रणवीरचा हा लूक पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पाहा व्हिडीओ

पारंपरिक लूकमध्ये रणवीरला पाहून नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. “न्यूड फोटोशूटसाठी पुरस्कार मिळाला का?”, “आज तू पूर्ण कपडे परिधान केले.”, “पहिल्यांदा तू योग्य ड्रेसिंग स्टाइल केली आहेस.”, “या कपड्यांमध्ये रणवीर एवढा चांगला दिसतो. कपडे परिधान न करत फोटोशूट करून तू काय मिळवलं?” अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

आणखी वाचा – Darlings Trailer : आलिया भट्टच्या बहुचर्चित ‘डार्लिंग्स’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, अभिनेत्रीच्या लूकने वेधलं साऱ्यांचं लक्ष

रणवीर सिंगच्या या फोटोशूटवर कमेंट करताना अर्जुन कपूरनं रणवीरला पाठिंबा दिला होता. या फोटोशूटबद्दल बोलताना, “जर रणवीर हे सर्व करून आनंदी असेल तर याचा आपणही सन्मान करायला हवा.” असं तो म्हणाला होता. याशिवाय अभिनेत्री आलिया भट्टने देखील रणवीरच्या या फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली होती. आलिया म्हणाली, “मी माझा आवडत्या सहकलाकार रणवीर सिंगबद्दल कोणतीही नकारात्मक चर्चा सहन करु शकत नाही. त्यामुळे मी हा प्रश्नदेखील सहन करु शकत नाही.”