Entertainment News Today, 23 April 2025 : सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचा ‘केसरी चॅप्टर २’ आणि सनी देओलचा ‘जाट’ चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहेत. तसंच मराठीमध्ये ‘सुशीला-सुजीत’, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’, ‘अशी ही जमवा जमवी’, ‘जयभीम पँथर’सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहेत. येत्या काळात ‘झापुक झुपूक’ आणि ‘देवमाणूस’ यांसारखे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. दुसऱ्या बाजूला काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याविषयी कलाकार मंडळी संतप्त भावना व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर कलाकार मंडळी पोस्ट करून हल्ल्याविषयी आपलं परखड मत मांडत आहेत. त्यामुळे आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील सर्व अपडेट्स जाणून घ्या…
Manoranjan News Updates : मनोरंजनविश्वातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या…
“शब्द आज नपुंसक…”, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अनुपम खेर हळहळले; म्हणाले, “द काश्मीर फाइल्स’ चित्रपटात…”
गेल्या सहा वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला काश्मीरमधील पहलगाम येथे झाला. या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. ज्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. त्यामुळे सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कलाकार मंडळींनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट करत निषेध व्यक्त केला आहे. अभिनेता अभिजीत केळकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, “…आता सौहार्द नको. आता घुसा आणि नकाशा कायमचा बदलून टाका. भिकेला लागून सुद्धा, अजूनही खुमखुमी असलेल्या भिकारड्या पाकिस्तानला, आता बेचिराख करायलाच हवं.”
Kesari Collection Day 5 : अक्षय कुमारच्या ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपटाने पाचव्या दिवशी केली ‘इतकी’ कमाई
‘स्काय फोर्स’नंतर अक्षय कुमारच्या ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ७.८४ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली. दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी अक्षय कुमारच्या चित्रपटाने अनुक्रमे १०.०८ कोटी, ११.७० कोटींचा गल्ला जमवला. पण, त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत मोठी घट पाहायला मिळाली. चौथ्या दिवशी या चित्रपटाने ४.५० कोटींची कमाई केली होती. तर पाचव्या ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपटाने फक्त ४ कोटींचा व्यवसाय केला. आतापर्यंत अक्षयच्या या चित्रपटाने ३८,१२ कोटींची कमाई केली आहे.
सध्या मनोरंजनाची पर्वणी सुरू आहे. बरेच नवे हिंदी, मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मराठी नाटकं रंगभूमी गाजवत आहेत. मनोरंजनविश्वातील दिवसभरातील सर्व अपडेट्स जाणून घ्या…