Operation Sindoor Celebrity Reactions : २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ भारतीय निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या केली होती. आता भारताने पाकिस्तानला उत्तर देत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं आहे. भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची नऊ तळं उद्ध्वस्त केली आहेत.
भारताने केलेल्या एअर स्ट्राईकला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं आहे. यावर आता बॉलीवूडसह मराठी कलाविश्वातून कलाकारांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सर्वत्र भारतीय लष्काराचं कौतुक करण्यात येत आहे.
Manoranjan News Updates 7 May 2025 – मनोरंजन विश्वातील घडामोडी
Kangana Ranaut reacts On OPERATION SINDOOR : ‘ऑपरेशन सिंदूर’वर कंगना रणौत यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “भारतीय लष्कराने…”
‘ऑपरेशन सिंदूर’ – दहशतवादाबाबत शून्य सहनशीलता
भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम सुरू केली आहे. संपूर्ण पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. अशी पोस्ट कंगना रणौत यांनी शेअर केली आहे.
OPERATION SINDOOR: ZERO TOLERANCE TO TERROR
— Kangana Ranaut (@KanganaTeam) May 7, 2025
The Indian Armed Forces launched a precision mission, Operation Sindoor; 9 terror camps across Pakistan and Pakistan-occupied Jammu & Kashmir neutralized.#OperationSindoor #NewIndia pic.twitter.com/VpQ1OLdpka
Operation Sindoor : “त्यांनी थेट माझा देश सोडून जावं…”, ‘ऑपरेशन सिंदूर’ एअर स्ट्राईकनंतर मराठी अभिनेत्री काय म्हणाली?
“…आणि आता मात्र ज्यांना पोटात दुखेल, त्यांनी थेट माझा देश सोडून जावं. घरातला आतंक आधी संपवायला हवा. मग बाहेरचा…जय हिंद!” अशी पोस्ट शेअर करत मराठी अभिनेत्री अदिती द्रविडने ‘ऑपरेशन सिंदूर’वर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Operation Sindoor : “यह नया हिंदुस्थान…”, ‘ऑपरेशन सिंदूर’वर ‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम अभिनेत्याची प्रतिक्रिया…
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेता सुमीत पुसावळेने ‘ऑपरेशन सिंदूर’वर प्रतिक्रिया दिली आहे. “यह नया हिंदुस्थान है, घर में घुस कें मारेगा…” अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे.
भारतीय लष्कराचा एअर स्ट्राईक ‘ऑपरेशन सिंदूर’वर मराठीसह बॉलीवूड कलाकारांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत वाचा…यासह मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…