मराठी चित्रपटात सध्या सुरू असलेल्या वेगवेगळ्या प्रयोगशीलतेमध्ये सर्कसवरील चित्रपटाची भर पडत आहे.दिग्दर्शक मंदार शिंदे याने ‘ध्यास’ या आपल्या पहिल्या चित्रपटासाठी सर्कस या गोष्टीचा जन्म, परंपरा आणि भवितव्य याभोवती फिरणा-या कथानकाला महत्व दिले आहे. या चित्रपटाचे सगळे चित्रीकरण चेन्नई आणि थायलंड येथे झाले आहे. विशेष म्हणजे एसआय टू के कॅमे-यावर पूर्णपणे चित्रीत झालेला हा मराठीतील पहिला थ्री-डी स्टिरिओस्कोपिक चित्रपट आहे.
या चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद अजीत दळवी यांची आहे. तर मंदार चौलकर यांच्या गाण्यांना लहू माधव या जोडीचे संगीत आहे. चित्रपटात सुहास पळशीकर, संदेश जाधव, मंदार कुलकर्णी, मिताली शिंदे, अनिल गवस, अनिल शिंदे आणि प्रशांत केतकर यांच्या भूमिका आहेत.
या सा-यात सर्कस हा या चित्रपटाचा केंद्रबिंदू सर्वात जास्त महत्वाचा. चित्रपटातील सर्कस म्हटली की कायम राज कपूर अभिनीत आणि दिग्दर्शित मेरा नाम जोकर (१९७०) याच चित्रपटाची आठवण येते, ध्यासच्या निमित्ताने तेही झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First time marathi movie on circus topic