बॉलिवूडमधील रितेश देशमुख आणि जेनेलियाच्या जोडीला चाहत्यांकडून कायम पसंती मिळते. दोघही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. आपल्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

जेनेलिया तिच्या फोटोंसोबतच मुलांसोबत मजा करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या या व्हिडीओंना चाहत्यांकडून मोठी पसंती मिळताना दिसते. जेनेलियाने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या पावरी स्टाइलने हा व्हिडीओ पोस्ट केला असला तरी यात जेनेलियाच्या हाताला दुखापत झाल्याचं दिसतंय. जेनेलिया स्केटिंग करत असताना पडल्याचं या व्हिडीओत दिसतंय. त्यामुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केलीय. जेनेलियाने “माझी रिकव्हरी पावरी स्टोरी” असं कॅप्शन देत नेमकं झालं ते सांगितलं आहे.

हा व्हिडीओ पोस्ट करत जेनेलियाने म्हंटलं आहे ” काही दिवसांपूर्वी मी स्केटिंग शिकण्याचं ठरवलं जेणे करुन मी जास्त प्रेरणायादी बनू शकते शिवाय माझ्या मुलांना चांगली कंपनी मिळेल. मला वाटलं मी स्केटिंग शिकल्यानंतर एक कूल व्हिडीओ इन्स्टग्रामवर शेअर करेन. पण नंतर मला वाटलं कि हा व्हिडीओच पोस्ट करावा. कराण इन्स्टावर सर्वच सक्सेस स्टोरी पोस्ट करतात मात्र जेव्हा आपण पडतो तेव्हाचं काय? काहीवेळा झेप घेण्यासाठी आधी तुम्हाला पडावं लागतं” असं कॅप्शन देत जेनेलियाने प्रयत्न करणं महत्वाचं असल्याचं म्हंटलं आहे. “पडल्यानंतरही पुन्हा उभं राहवं हे मला कळलंय. मी प्रयत्न केला. आणि मी यश मिळेपर्यंत सतत प्रयत्न करत राहिन” असं कॅप्शन देत जेनेलियाने तिच्या चाहत्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडीओ तिने 8 मार्चला रात्री पोस्ट केलाय.

या मजोशीर व्हिडीओतूनही जेनेलियाने एक चांगला संदेश तिच्या चाहत्यांना दिलाय. आयुष्यात प्रत्येकानं नवं काही तरी शिकत राहवं आणि त्यात हार मानू नये असं सांगण्याचा तिने एक उत्तम मार्ग शोधलाय. जेनेलियाच्या या व्हिडीओला चाहत्यांनी मोठी पसंती दिलीय. जेनेलिया अनेकदा धमाल व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.