काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या विरोधात महामारी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील इकोटेक पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासह १५३ कार्यकर्ते आणि ५० इतर लोकांवर १५५/२०२०, १८८, २६९, २७० आयपीसी आणि ३ महामारी अॅक्ट अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईवर अभिनेत्री स्वरा भास्कर हिने संताप व्यक्त केला आहे. “शाबाश राहुल गांधी” अशा आशयाचं ट्विट करुन तिने काँग्रेसचं कौतुक केलं आहे. सोबतच तिने राहुल गांधी यांनी केलेल्या आंदोलनाचा एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.
अवश्य पाहा – बिग बॉस १४ मध्ये झळकणार ग्लॅमरस पवित्रा; ७ दिवसांसाठी मिळणार लाखो रुपयांचं मानधन
Well done @RahulGandhi ! Resolve! #StandUpForJustice #UPRapeEpidemic #EndRapeCulture #Hathras https://t.co/UJpcE9XG0s
— Swara Bhasker (@ReallySwara) October 1, 2020
अवश्य पाहा – “प्यार एक धोका हैं…” अभिनेत्रीला प्रियकराने फसवलं: दुसऱ्याच तरुणीबरोबर केलं लग्न
गुरुवारी दुपारी हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधी यांनी लाँग मार्च काढला होता. मात्र या दरम्यान राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप होतो आहे. तर प्रियंका गांधी यांना पोलिसांनी कुटुंबीयांना भेटण्यापासून रोखल्याचा आरोप होतो आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लोकांनी गर्दी करण्यास मनाई करण्यात आलेली होती. तसंच सीमेवर बॅरिकेड्सही लावण्यात आले होते. तरीही काँग्रेस नेत्यांनी एपॅडेमिक अॅक्टचं उल्लंघन केलं. त्यामुळे त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.