लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खान स्तनाच्या कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्यात होती. तिच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे आणि अभिनेत्री तिच्या आरोग्याची चांगली काळजी घेत आहे.

अलीकडेच ती कर्करोगाचे निदान झाल्यानंतर काम न मिळाल्याने होणाऱ्या नुकसानीबद्दल बोलली. जाणून घ्या अभिनेत्री काय म्हणाली.

कर्करोगामुळे हिना खानला काम मिळत नाहीये

स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर हिना खान पुन्हा एकदा टीव्ही पडद्यावर परतली आहे. ‘पती पत्नी और पंगा’ या शोमध्ये तिला पुन्हा एकदा टीव्ही पडद्यावर पाहून चाहते खूप आनंदी आहेत. पण, याआधी तिच्या आजारामुळे अभिनेत्रीला अनेक मोठे प्रोजेक्ट गमवावे लागले. कर्करोगानंतर काम न मिळाल्याबद्दल पीटीआयशी संवाद साधताना हिना खानने दुःख व्यक्त केले. ती म्हणाली, “या सगळ्यानंतर हा माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे. मला काम करायचे आहे. मला कोणीही थेट सांगितले नाही, परंतु मला असे वाटते की बरेच लोक अजूनही माझ्याबरोबर काम करण्यास कचरत आहेत.”

हिना पुढे म्हणाली, “हे ठीक आहे, पण मला हा नियम मोडावा लागेल. जर मी त्यांच्या जागी असते तर मी हजार वेळा विचार केला असता. मी ऑडिशनसाठीदेखील तयार आहे.” याबरोबरच हिना खानने खुलासा केला की, गेल्या एक वर्षापासून तिला कोणीही कामासाठी बोलावले नाही. आता ती कामासाठी पूर्णपणे तयार आहे आणि तिला कामासाठी फोन यावे असं तिला वाटतं. यानंतर हिना खान म्हणाली की, तिच्या आजाराशी झुंज दिल्यानंतर ती आता टीव्ही पडद्यावर परतली आहे आणि ती याबद्दल खूप आनंदी आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील अक्षराच्या भूमिकेसाठी हिना खान ओळखली जाते. या मालिकेद्वारे तिने तिची लोकप्रियता गगनाला भिडवली. त्यानंतर ती ‘कसौटी जिंदगी की २’, ‘खतरों के खिलाडी सीझन ८’ आणि ‘बिग बॉस ११’ सारख्या शोचा भाग होती. या शोमुळे अभिनेत्रीची लोकप्रियताही खूप वाढली. आजकाल हिना खान कलर्सवरील शो ‘पती पत्नी और पंगा’ मध्ये दिसते. हिना खान तिचा पती रॉकी जयस्वालसह चाहत्यांकडून खूप प्रेम मिळवत आहे.