आजच्या युगाचा गायक हनी सिंग हा तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. हा रॅपर यो यो हनी सिंग एका सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये ऑडिशनला आलेल्या गायकांवर इतका खूश झाला की त्याने निवड झालेल्या स्पर्धकांना सोन्याचे लॉकेट भेट म्हणून दिले. ‘इंडियाज रॉ स्टार’ नावाच्या आगामी सिंगिंग रिअॅलिटी शोसाठी रॅप गायक हनी सिंग सध्या ऑडिशन घेत आहे. ‘इंडियाज रॉ स्टार’ स्पर्धेतील १० योग्य स्पर्धकांची निवड करण्यासाठी हनी सिंगने अहमदाबाद, वाराणसी आणि जयपूरसारखी शहरे पालथी घातली. डिजिटल ऑडिशनच्या माध्यामातून त्यांची निवड करण्यात आली. स्पर्धकांमधील गायन कौशल्याला त्याच्यामार्फत उत्कृष्ट दाद मिळावी, म्हणून या लॉकेटच्या डिझाईनवर त्याने व्यक्तिश: लक्ष दिले. उत्कृष्ट गायकाचा शोध घेणाऱ्या स्टार प्लसवरील या शोचा हनी सिंग जजदेखील असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honey singh gifts pure gold lockets