India vs Pakistan Match Marathi Celebrities Reactions :भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना असला की क्रिकेटप्रेमींमध्ये कायमच उत्सुकता असते. सामान्य प्रेक्षकांबरोबरच मैदानावर खेळाडूंमध्येही हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो. असंच काहीसं झालं, नुकत्याच झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात. आधीच दोन वेळा भारताने पाकिस्तान संघाला धूळ चारल्यानंतर अंतिम सामन्यातही भारताने विजय मिळवला.

या विजयानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. याशिवाय बॉलीवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनीही खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्याचबरोबर अनेक मराठी कलाकारांनीसुद्धा भारताच्या विजयाबद्दल सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

पुष्कर जोग, सलील कुलकर्णी, अभिजीत केळकर, पूजा सावंत, पूजा कातुर्डे, सिद्धार्थ चांदेकर, विदीशा म्हसकरसह अनेक मराठी कलाकारांनी भारतीय संघाच्या विजयावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पुष्कर जोगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं, आम्ही सुद्धा ठोकतो पण मैदानात, लोकांना नाही. नाही, मी सामना पाहत नाहीये… पण आपण त्यांच्याविरुद्ध कधी कावाई करणार आहोत. पाकिस्तानवर सगळीकडून बंदी घातली पाहिजे.”

भारताच्या विजयावर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया (फोटो : इन्स्टाग्राम स्टोरी)

सलील कुलकर्णी म्हणतात, “सूर्या आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो! तिलक वर्मा हा तर खरंच एक हिरा आहे!” दीप्ती देवी या अभिनेत्रीनेही पोस्ट शेअर करत भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. तो म्हणते, “शेवटी सगळं चांगलंच होतं! तिलक वर्मा आणि संपूर्ण टीम इंडियाचं हार्दिक अभिनंदन!”. तर अभिनेता अभिजीत केळकरने पोस्ट शेअर करत “ऑपरेशन सिंदूर नंतर ऑपरेशन तिलक” असं म्हटलंय.

भारताच्या विजयावर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया (फोटो : इन्स्टाग्राम स्टोरी)

अभिनेत्री विदीशा म्हसकर हिने “पाकिस्तानवाले प्रत्येकवेळी शेवटी येऊन कसे हरतात? मला आयुष्यात एक कळलं आहे की, मला काय नाही व्हायचंय. पाकिस्तान.” यासह तिने हसण्याचा इमोजीसुद्धा जोडला आहे. याशिवाय पूजा सावंतने विजयाचे काही खास क्षण आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर करत “चॅम्पियन्स” असं म्हटलं आहे. तर सिद्धार्थ चांदेकर आणि Bleed Blue असं म्हणत भारतीय संघाचं विजयाबद्दल कौतुक केलं आहे. यांसह अनेक कलाकारांनीसुद्धा भारताच्या विजयाबद्दल संघाचं आणि खेळाडुंचं कौतुक केलं आहे.

भारताच्या विजयावर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया (फोटो : इन्स्टाग्राम स्टोरी)

दरम्यान, दुबईच्या मैदानात रविवारी या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ विकेट्स अन् २ चेंडू राखून धूळ चारली. भारताने पाकिस्तानला या स्पर्धेत तिसऱ्यांदा पराभूत करत जेतेपद पटकावलं आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू नये असं म्हणत या सामन्यांना विरोध केला जात होता. याबद्दलही अनेकांनी आपली मतं सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहेत.