विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये १७ पुरस्कार मिळविलेला ‘कोर्ट’ हा मराठी चित्रपट पुढील महिन्यात महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. २० आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने १७ पुरस्कार मिळविले आहेत.या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन चैतन्य ताम्हाणे यांचे असून चित्रपटात वीरा साथीदार, विवेक गोम्बर, गीतांजली कुलकर्णी, प्रदीप जोशी, उषा बने, शिरीष पवार हे मुख्य कलाकार आहेत. चित्रपटाचे संगीत शाहीर संभाजी भगत यांचे आहे.भारतातील ‘मामी’ चित्रपट महोत्सवासह केरळ व पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तसेच व्हेनिस, व्हिएन्ना, हॉंगकॉंग, मॉस्को, सिंगापूर आणि अन्य विविध ठिकाणच्या चित्रपटमहोत्सवात ‘कोर्ट’ला गौरविण्यात आले आहे.
विवेक गोम्बर यांच्या झू एन्टरटेन्मेंटची निर्मिती असलेला हा चित्रपट १७ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Mar 2015 रोजी प्रकाशित
आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘कोर्ट’ पुढील महिन्यात प्रदर्शित होणार
विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये १७ पुरस्कार मिळविलेला ‘कोर्ट’ हा मराठी चित्रपट पुढील महिन्यात महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
First published on: 19-03-2015 at 06:49 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International award winner marathi movie court will be released in next month