मिका सिंगचे ‘बिल्लो’ हे गाणे सध्या चर्चेत आहे. या गाण्यात वरुण धवन आणि जॅकलीन फर्नांडिस ही जोडी झळकणार आहे. मिकाचे हे गाणे प्रदर्शित होण्यापूर्वी या तिगडीने त्याच्या काही ओळी गुणगुणतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर टाकण्यात आला आहे. पण हे गाणे गाताना जॅकलीनकडून अशी काही चूक झाली की, त्यामुळे तिचा चेहराचं लाल पडला.
झाले असे की, मिकाने गाणे गायले गायल्यानंतर जॅकलीनला ‘चक दे फट्टे’ म्हणण्यास सांगितले. जॅकलीन जेव्हा वरुणकडे हात करून ‘चक दे फट्टे’ म्हणत असताना अचानक तिच्या तोंडून ‘चक दे फXX दे’ असे उच्चारले गेले. जॅकलीनच्या परदेशी उच्चारामुळे तिच्याकडून नकळत ही चूक झाली. आपण चुकीचा उच्चार केल्याचे समजताच जॅकलीनला अवघडल्यासारखे झाले. मात्र, यामुळे नेटिझन्सना आता एक चर्चेचा विषय मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jacqueline fernandez says chak de fxxk de to varun dhawan