जगप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेझचा आज २४ जुलै जेनिफरचा वाढदिवस आहे. आज जेनिफर तिचा ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रत्येक कलाकाराला स्वत: चे नाव कमवायला मेहनत करावी लागते. त्यात अनेक अडथळे येतात. असाच एक अनुभव जेनिफरला देखील आला होता. जेनिफरने तिच्या लैंगिक छळाबाबत भाष्य केले आहे. या विषयी जेनिफरने एका मुलाखतीत सांगितले होते.
जेनिफरने ‘हार्पर बाझार’ या मॅगझिनला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत जेनिफरने खुलासा केला आहे. “मी माझ्या करिअरची सुरुवात करत होते. माझा त्यासाठी संघर्ष सुरु होता. त्यावेळी मला एक वाईट अनुभव आला होता. तो अनुभव आठवला तरीही माझ्या अंगावर भीतीने काटा येतो. मी चित्रपटात काम करण्यासंदर्भात एका दिग्दर्शकाला भेटले,” असे जेनिफर म्हणाली.
आणखी वाचा : “ए आर रहमान कोण आहे?, ‘भारतरत्न’ माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा”
त्यावेळी काय घडले या विषयी सांगताना जेनिफर म्हणाली, “तेव्हा त्याने मला शर्टलेस व्हायला सांगितले. मी तुला अर्धनग्न अवस्थेत बघू इच्छितो अशी इच्छा त्याने प्रकट केली. पहिल्याच भेटीत त्याने मला हे सांगितले. त्यामुळे मला काही सुचत नव्हते आणि मी घाबरले. मी तिथून तातडीने काढता पाय घेतला. मात्र हा अनुभव मी कधीही विसरू शकत नाही. त्यावेळी चित्रपटात काम करूच नये असाही विचार माझ्या मनात आला होता.”