बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘अ‍ॅटॅक’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं प्रमोशन जोरदार सुरू आहे. मात्र नुकत्याच एका प्रमोशन इव्हेटमध्ये जॉन अब्राहमचा अँग्री लुक पाहायला मिळाला. द कश्मीर फाइल्स चित्रपटाबाबत प्रश्न विचारल्यावर जॉन चिडलेला पाहायला मिळाला. एवढंच नाही तर जेव्हा त्याला त्याच्या चित्रपटातील अ‍ॅक्शनच्या भडिमाराबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हाही त्याला राग अनावर झालेला दिसला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जॉन अब्राहमला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, ‘जॉन तुझ्या चित्रपटांमध्ये अ‍ॅक्शन असते पण कधी कधी त्याचा ओव्हरडोज होतो. तू जेव्हा ४-५ लोकांशी फाइट करतोस तेव्हा ठीक असतं पण जेव्हा तू २०० लोकांशी लढताना दिसतोस, चॉपर हाताने उडवतोस, कार हवेत उडवतोस तेव्हा ते लोक याच्याशी रिलेट करू शकत नाहीत.’ यावर जॉननं त्या पत्रकाराला तुम्ही ‘अ‍ॅटॅक’च्या ट्रेलरबद्दल बोलताय का असं विचारलं. त्यावर त्या पत्रकारानं, ‘नाही, सत्यमेव जयते’ असं उत्तर दिलं. पत्रकाराच्या उत्तरावर जॉन म्हणाला, ‘अशा दृश्यांसाठी माफ करा पण इथे मी ‘अ‍ॅटॅक’बद्दल बोलत आहे.’

आणखी वाचा- Video: लग्झरी कार सोडून प्रसिद्ध अभिनेत्यानं केला ट्रेनमधून प्रवास, तुम्ही ओळखलंत का?

यावेळी बोलताना रागाच्या भरात जॉननं त्या पत्रकाराला ‘डंब’ म्हणजेच मूर्ख असंही म्हटलं. तो म्हणाला, ‘मी इथे तुम्हा सर्वांची माफी मागतो. मी फिजिकली फिट होण्यापेक्षा जास्त मेंटली फिट होण्याकडे लक्ष देतो. कारण मला अशा मूर्ख लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. माफ करा सर पण तुम्ही तुमचा मेंदू घरी ठेवून आलात. मी तुमची माफी मागतो. ठीक आहे मी सर्वांच्या वतीने तुमची माफी मागतो.’

जेव्हा जॉनला जेव्हा ‘द कश्मीर फाइल्स’बद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना त्यानं म्हटलं, ‘मी हा चित्रपट पाहिलेला नाही त्यामुळे मी यावर काहीच बोलू शकत नाही. तुम्ही मला ‘अ‍ॅटॅक’बद्दल प्रश्न विचारा. तुम्हाला डेस्कवर सांगितलं जातं की काहीतरी वादग्रस्त घेऊन या तर तुम्ही येऊन ‘द कश्मीर फाइल्स’बद्दल विचारता. कृपया मला सारखे तेच तेच प्रश्न विचारू नका आणि माझ्या चित्रपटाशी संबंधितच प्रश्न विचारा.’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: John abraham angry reaction on question about the kashmir files video goes viral mrj