जॉन अब्राहम, शूजित सरकार आणि यूटीव्ही मोशन ही तिगडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. जॉन पुन्हा एकदा वैवाहिक नाट्यावर आधारित चित्रपट घेऊन येत असून, या चित्रपटाचे नाव ‘सतरा को शादी है’ असे असणार आहे. यात टीव्ही अभिनेता बरून सोब्ती आणि सपना पब्बी यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.
जॉनच्या या चित्रपटातही डान्स, ड्रामा, दोन पिढ्यांमधील अंतर, लग्नाशी निगडीत अनेक समारंभांचा समावेश आहे. इतकेच नाही तर यात ५० कलाकारांची समावेश असल्याचे शूजित सरकारने सांगितले असून याचे चित्रीकरण भोपाळ येथे करण्यात येणार आहे. मुंबईत आयटीमध्ये काम करणारा मुलगा आणि भोपाळची मुलगी यांची एका विवाहजुळवणी वेबसाइटवर भेट होते आणि तेथेच त्यांच्या प्रेमाला सुरुवात होते, अशी चित्रपटाची कथा आहे. हा चित्रपट अरशद सय्यद दिग्दर्शित करत आहे. फरहान अख्तर आणि विद्या बालन अभिनीत ‘शादी के साइड इफेक्ट्स’ ची पटकथा अरशदनेच लिहिली होती.