Kantara Chapter 1 Box Office Collection Day 1 : ब्लॉकबस्टर कन्नड चित्रपट ‘कांतारा’चा प्रीक्वल जगभरात रिलीज झाला आहे. ऋषभ शेट्टीचा या वर्षीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘कांतारा चॅप्टर १’ अखेर प्रदर्शित झाला आहे. गुरुवारी, २ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. आणि त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ‘कांतारा चॅप्टर १’ या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. परिणामी ‘कांतारा चॅप्टर १’ ने बॉक्स ऑफिसवर दमदार, रेकॉर्ड ब्रेकिंग ओपनिंग केली आहे.

‘कांतारा चॅप्टर १’ जगभरात कन्नड, हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हिंदी बॉक्स ऑफिसवर, हा चित्रपट १५ कोटींपेक्षा जास्त कमाई करेल, अशी अपेक्षा आहे.

‘कांतारा चॅप्टर १’ हा ऋषभ शेट्टीच्या २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ चित्रपटाचा प्रीक्वल आहे. हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात बिग बजेट कन्नड चित्रपट आहे. त्याचबरोबर या वर्षीचा मोस्ट अवेटेड भारतीय चित्रपट आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, ‘कांतारा चॅप्टर १’ ने पहिल्या दिवशी भारतात तब्बल ६० कोटींची कमाई केली आहे.

‘कांतारा चॅप्टर १’ चे अॅडव्हान्स बुकिंग देखील जबरदस्त झाले होते. त्यामुळे चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच कोट्यावधी रुपये कमावले. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये १९.४४ कोटी (ब्लॉक केलेल्या सीट्सशिवाय) आणि २१.८३ कोटी (ब्लॉक सीट्ससह) कमावले आहेत.

Kantara Chapter 1 ट्रेलर

भारतात ६० कोटी कमावणाऱ्या ‘कांतारा चॅप्टर १’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी या वर्षातील अनेक हिट चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनला मागे टाकलं आहे. ज्यात सैयारा (२२ कोटी), सिकंदर (२६ कोटी) आणि छावा (३१ कोटी) यांचा समावेश आहे.

ऋषभ शेट्टी लिखित आणि दिग्दर्शित, ‘कांतारा चॅप्टर १’ मध्ये रुक्मिणी वसंत, जयराम आणि गुलशन देवैया यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचं समीक्षक व प्रेक्षक कौतुक करत आहेत. तसेच सिनेमा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. हा चित्रपट वीकेंडला किती कमाई करतो, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.