गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टी आणि परीक्षा यांचा संबंध आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक परीक्षेत चित्रपटाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आल्याचेही पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेवर अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुष्पा द राईज या चित्रपटातील एका संवाद लिहिला होता. त्यानंतर ही उत्तरपत्रिका व्हायरल झाली होती. त्यानंतर आता असाच काहीसा प्रकार एका सरकारी परीक्षेत घडल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच एका परीक्षेत कांतारा या बहुचर्चित चित्रपटातील प्रश्न विचारण्यात आला होता.

‘कांतारा’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी या चित्रपटाची क्रेझ अद्याप कायम आहे. कर्नाटकातील एका लोककलेवर आणि तिथल्या अनुसूचित वर्गाच्या रूढी परंपरेवर हा चित्रपट आधारित आहे. गावातील जमीनदार वर्गाची मक्तेदारी आणि त्यांनी केलेला अन्याय या गोष्टीलाही या चित्रपटाच्या माध्यमातून वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.या चित्रपटाला आयएमडीबी या साईटवर सर्वात जास्त रेटिंग पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
आणखी वाचा : “तो पैशासाठी गेला…” ओंकार भोजनेच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मागील एक्झिटचं खरं कारण समोर

नुकतंच या चित्रपटाशी संबंधित एक प्रश्न सरकारी परीक्षेत विचारण्यात आला होता. यानंतर आता सर्वत्र याबद्दलची प्रश्नपत्रिका व्हायरल होताना दिसत आहे. कर्नाटक दूध महासंघाने नुकतंच एका प्रवेश परीक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षेत कांतारा या चित्रपटाशी संबंधित एक प्रश्न विचारण्यात आला होता.

कांतारा हा चित्रपट कोणत्या कथेवर आधारित आहे?

जल्लीकट्टू

भूतकोला

यक्षगाणा

दम्मामी

आणखी वाचा : मी कन्नडमध्येच काम करणार! रिषभ शेट्टीचं कारण ऐकून तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल

दरम्यान मल्टीपल चॉईज प्रश्नांमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक नेटकरी या प्रश्नाचे उत्तर देताना दिसत आहेत. ‘कांतारा’ हा चित्रपट ३० सप्टेंबरला त्याच्या मूळ कन्नड या भाषेत प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी त्याचे कौतुक केले होते. सध्या या चित्रपटाने ९० कोटी इतकी कमाई केली आहे. याला मिळालेली लोकप्रियता पाहता या चित्रपटाला तेलुगू आणि हिंदी भाषेत डब करून प्रदर्शित करण्याचा निर्णय या चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला.