कलाविश्वातील आघाडी नायिका म्हणजे करीना कपूर-खान. उत्तम अभिनयशैली आणि बिंधास्त अंदाज यामुळे करीना अनेकांची क्रश आहे. त्यामुळे अनेक वेळा चाहत्यांमध्ये तिची चर्चा रंगत असते. यातच सध्या सोशल मीडियावर करीनाचा फेविकॉल या गाण्यातील बिहाइंड द सीनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती गाण्याचा अर्थ विचारताना दिसत आहे.

अभिनेता सलमान खान याचा लोकप्रिय ठरलेल्या दबंग २ या चित्रपटातील फेविकॉल हे गाणं विशेष गाजलं होतं. या गाण्यात करीना कपूर झळकली होती. विशेष म्हणजे या गाण्याचे बोल ऐकल्यानंतर हे नेमकं काय गाणं आहे असा प्रश्न तिने विचारला होता. हे गाणं  ‘फिल्मीकिडा’ यांनी शेअर केलं आहे.

व्हायरल होत असलेल्या माय जिप्सी विथ सायरन तयार ही ओळक ऐकू येत असून त्यावर हे काय गाणं आहे असं म्हणत करीना हसते आणि या गाण्याचा नेमका अर्थ काय असं विचारते.

दरम्यान, सध्या करीनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. करीना लवकरच लाल सिंह चड्ढा या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आमिर खान स्क्रीन शेअर करणार आहे.