बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सतत चर्चेत असते. कधी तिच्या कपड्यांमुळे तर कधी तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे. पण बऱ्याच वेळा करीनाला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. सध्या सोशल मीडियावर करीनाला तिच्या कपड्यांमुळे ट्रोल केले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर करीनाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये करीनाने काळ्या रंगाचा टॉप आणि पँट घातली आहे. या लूकमध्ये ती सुंदर दिसत आहे. पण करीनाने घातलेल्या टॉपमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

करीनाने घातलेला टॉप एखाद्या नाईट ड्रेससारखा वाटत असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. एका यूजरने ‘नाईट ड्रेस घालून आली आहेस का?’ असे विचारले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘आता नायटी घालून आली. आता यांच्या स्टारयलिस्टकडचे फाटलेले कपडे देखील संपले. देवा, आणखी काय काय पाहायला मिळणार आहे’ या आशयाची कमेंट केली आहे. सध्या करीनाला या ड्रेसमुळे प्रचंड ट्रोल केले जात आहे.

करीना कपूर खान लवकरच लाल सिंग चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे. तिच्यासोबत बॉलिवूड अभिनेता आमिर खान मुख्य भूमिकेत आहे. तसेच हा चित्रपट १४ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoor khan gets attacked by trolls again for wearing nighty top avb