Sunjay Kapur Funeral: करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर यांचे १२ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाला एक आठवडा झाल्यानंतर त्यांचे पार्थिव लंडनहून दिल्लीला आणण्यात आले. संजय कपूर यांच्यावर आज (१९ जून रोजी) दिल्लीत अंत्यसंस्कार झाले. सायंकाळी दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. २२ जून रोजी ताज पॅलेस हॉटेलमध्ये प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

१२ जूनच्या रात्री त्यांच्या मृत्यूची बातमी आली. संजय युकेमध्ये पोलो मॅच खेळत होते, तेव्हा एक मधमाशी त्यांच्या तोंडात शिरली आणि श्वासनलिका बंद झाली. त्यामुळे गुदमरल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं.

Live Updates

Manoranjan News Updates:

09:54 (IST) 19 Jun 2025

संजय कपूर यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार

संजय कपूर यांचे १२ जून रोजी निधन झाले. (फोटो – इन्स्टाग्राम)