बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. कार्तिक सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आर्यन चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच आर्यनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत आर्यनने त्याच्या आगामी चित्रपटा विषयी चाहत्यांना माहिती दिली आहे.

कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे कार्तितने ‘कॅप्टन इंडिया’ या त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये कार्तिक कॅप्टनच्या युनिफॉममध्ये दिसत आहे. तर पोस्टरमध्ये कार्तिकचा चेहरा दिसत नसून समोर एक विमान आणि काही घरं दिसत आहेत. चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करत “जेव्हा आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी एक पुरुष जातो, मोठ्या अभिमानाने आणि सन्मानाने आम्ही तुमच्यासाठी आणत आहोत ‘कॅप्टन इंडिया’,” अशा आशयाचे कॅप्शन कार्तिकने दिले आहे. कार्तिकने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख किंवा हा चित्रपट कुठे पाहता येणार याची कोणतीही माहिती दिलेली नाही.

आणखी वाचा : “ए आर रहमान कोण आहे?, ‘भारतरत्न’ माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा”

आणखी वाचा : “ही त्याच्या कर्मांची शिक्षा,” पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्राला आणखी एक धक्का

‘कॅप्टन इंडिया’ या चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहता करणार आहेत. हंसल मेहता यांच्या ‘स्कॅम १९९२’ या वेब सीरिजने सगळ्याची मने जिंकली. एवढंच नाही तर लवकरच कार्तिक ‘सत्यनारायण की कथा’ या चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यानंतर कार्तिकला ‘शेहजादा’ या चित्रपटात दिसरणा असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चित्रपटाच्या चर्चेसाठी कार्तिक रोहित धवनच्या ऑफिसमध्ये गेल्याचे म्हटले जाते.