बॉलीवूड सेलिब्रेटी या ना त्या कारणाने नेहमीचं चर्चेत असतात. त्यातलीच प्रसिद्ध जोडी म्हणजे रणबीर कपूर आणि कतरिना कैफ. हे कथित प्रेमीयुगुल कुठेही एकत्र जरी दिसले तरी चर्चेचा विषय बनते. पण, यावेळचे कारण काही वेगळेचं आहे. तर झाले असे की, गेल्या काही दिवसांपासून रणबीरचे वडील म्हणजेचं अभिनेता ऋषी कपूर यांना कतरिना ही ‘पापा’ म्हणून हाक मारते अशी अफवा पसरली होती. त्यामुळे रणबीर-कतरिना लवकरच लग्नबंधनात अडकणार की काय या चर्चेलाही उधाण आले होते. मात्र, तसे काही नसल्याचा खुलासा नुकताचं रणबीरने केला.
‘तमाशा’ या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत रणबीरने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी रणबीरने माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देत, कतरिना माझ्या वडिलांना (ऋषी कपूर) ‘पापा’ नाही तर ‘ऋषीजी’ म्हणून हाक मारते असे सांगितले. विशेष म्हणजे, हे सांगत असताना रणबीरच्या चेह-यावर स्मितहास्य होते तर दुसरीकडे दीपिका या सगळ्याचा आनंद लुटताना दिसली.
रणबीर सध्या ‘ए दिल है मुश्किल’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Dec 2015 रोजी प्रकाशित
कतरिना माझ्या वडिलांना ‘पापा’ म्हणत नाही- रणबीर कपूर
रणबीर-कतरिना लवकरच लग्नबंधनात अडकणार की काय या चर्चेलाही उधाण आले होते.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:

First published on: 01-12-2015 at 16:53 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina doesnt call my father papa she calls him rishiji says ranbir kapoor at tamasha success bash