करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक शक्यतो घरी राहत आहे. सरकारनेदेखील नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण सध्या घरातच त्यांचा वेळ व्यतीत करत आहेत. ऑफिस, महाविद्यालये बंद असल्यामुळे प्रत्येक जण घरी राहून या फावल्या वेळेचा सदुपयोग करत आहे. यात अभिनेत्री कतरिना कैफदेखील घरी राहून खूप काही गोष्टी करत आहे. अलिकडेच तिने घरात व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर आता तिने एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे.
कतरिनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत ती सध्या घरात काय करते हे सांगितलं आहे. कतरिनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती भांडी घासताना दिसत आहे. विशेष म्हणजे भांडी घासत असताना कतरिनाने एक मोलाचा सल्लादेखील दिला आहे. कतरिनाने व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यावर हटके कमेंट दिल्या आहेत.
शेअर केल्या व्हिडीओमध्ये कतरिना भांडी कशी घासावीत हे सांगत आहे. सोबतच पाण्याचा अनावश्यक अपव्यय टाळा हेदेखील तिने सांगितलं. कतरिनाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, माझ्या घरात तुमचं स्वागत आहे, अशी कमेंट अर्जुन कपूरने केली आहे. तर एका अभिनेत्याने तिला कांताबेन 2.0 असं म्हटलं आहे.
दरम्यान, कतरिना सध्या आयसोलेशनमध्ये आहे. मात्र घरात राहूनदेखील ती सोशल मीडियावर सक्रीय आहे. आहे. यापूर्वी तिने व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. तर वरुण धवन, अर्जुन कपूर यांच्यासोबत व्हिडीओ कॉल करतानाचा एक फोटोही तिने शेअर केला होता.