‘सोनी टीव्ही’वरील लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या १४ व्या पर्वा ची सुरुवात झाली आहे. अभिनेता आमिर खान पहिला पाहुणा म्हणून अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर दिसला. याशिवाय ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ स्पेशल या एपिसोडमध्ये मेजर डीपी सिंग, कर्नल मिताली मधुमिता हे दिग्गजही सहभागी झाले होते. बिग-बी अमिताभ बच्चन यांनी आमिरसोबत खेळाची सुरुवात केली. खेळ पुढे सरकत गेला आणि ५० लाखांसाठी आमिरला बिग बींनी प्रश्न विचारला. मात्र, या प्रश्नासाठी आमिरला लाइफ लाइन वापरावी लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमिताभ बच्चन यांनी आमिर खान, कर्नल मिताली आणि मेजर डीपी सिंग यांना भारताच्या राजकीय इतिहासाशी संबंधित प्रश्न विचारला. जो प्रेक्षकांनाही खूप कठीण वाटू शकतो. यासाठी आमिर खानने ५०-५० लाइफ लाइन वापरली. त्यानुसार ५० लाखांसाठीच्या प्रश्नाचं अचूक उत्तर देत पहिल्या एपिसोडमध्ये आलेल्या पाहुण्यांनी ५० लाखांची बक्षीस रक्कम जिंकली. ही रक्कम आर्मी वेल्फेअरला दान केली जाणार आहे. पण असा कोणता प्रश्न होता ज्याचं उत्तर आमिर खानलाही देता आलं नाही. पाहूयात…

आणखी वाचा- “चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा पंजाबीच का?” नागराज मंजुळेंच्या प्रश्नावर आमिर खानने दिलं उत्तर

अमिताभ बच्चन यांनी ५० लाखांसाठी आमिर खानला, ‘कोणत्या भारतीय राष्ट्रपतींनी एकमेकांना भारतरत्न दिला आहे?’ हा प्रश्न विचारला होता. या प्रश्नासाठी चार पर्याय देण्यात आले होते.

१. एस राधा कृष्णन- व्हीव्ही गिरी

२. व्हीव्ही गिरी- झाकीर हुसेन

३. झाकीर हुसेन- प्रतिभा पाटील

४. राजेंद्र प्रसाद- एस राधाकृष्णन

आणखी वाचा- “…तेव्हा माझे हात, पाय थरथरतात” अमिताभ बच्चन यांनी सांगितला ‘कौन बनेगा करोडपती’ सेटवरचा अनुभव

अमिताभ बच्चन यांनी ५० लाखांसाठी विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आमिर खानला लाइफ लाइन वापरावी लागली. या प्रश्नाचं अचूक उत्तर, पर्याय क्रमांक चार ‘राजेंद्र प्रसाद- एस राधाकृष्णन’ असं होतं. सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. १९५४ मध्ये त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला आणि यावेळी राजेंद्र प्रसाद देशाचे राष्ट्रपती होते. एस कृष्णन त्यावेळी उपराष्ट्रपती म्हणून कार्यरत होते. तर राजेंद्र प्रसाद यांना १९६२ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर भारतरत्न प्रदान करण्यात आला आणि या काळात एस राधाकृष्णन राष्ट्रपती पदावर होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kbc 14 aamir khan use life line for this 50 lakh question do you know the correct answer mrj
First published on: 08-08-2022 at 14:26 IST