KGF Chapter 2 चित्रपटातील अभिनेते मोहन जुनेजा (Mohan Juneja) यांचे आज ७ मे रोजी सकाळी निधन झाले. मोहन दीर्घ आजाराशी झुंज देत होते. बंगळुरू येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहन जुनेजा हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. याशिवाय त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. मोहन यांनी केजीएफ चॅप्टर वनमध्येही काम केले होते, पार्ट वनमध्ये ते पत्रकाराच्या भूमिकेत दिसले होते. सगळ्यांना त्यांच्या कॉमेडीने हसवणाऱ्या मोहन यांनी आज सगळ्यांचे डोळ्यात अश्रू आणले आहे.

मोहन जुनेजा यांनी १०० हून अधिक चित्रपट केले आहेत. ‘चेलता’ या चित्रपटातून त्यांना ओळख मिळाली. मोहन यांनी तामिळ, तेलगु, मल्याळम या भाषांमध्ये चित्रपट केले आहेत. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या संगमा या कन्नडा चित्रपटातून मोहन यांनी करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी टॅक्सी नंबर या चित्रपटात काम केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kgf chapter two actor mohan juneja dies at the age of 54 dcp