scorecardresearch

टॉलिवूड

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये तेलुगू भाषा बोलली जाते. या प्रदेशामध्ये अस्तित्त्वामध्ये असलेल्या फिल्म इंडस्ट्रीला टॉलिवूड (Tollywood) असे म्हटले जाते. १९२१ मध्ये टॉलिवूडमधील ‘भीष्म प्रतिज्ञा’ पहिला चित्रपट (मूकपट) रघुपती वैकंय्या नायडू यांनी तयार केला. तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमधील योगदानाबद्दल त्यांना टॉलिवूडचे जनक असे म्हटले जाते. १९३२ मध्ये ‘भक्त प्रल्हाद’ हा पहिला तेलुगू भाषिक बोलपट प्रदर्शित करण्यात आला. काही वर्षांपूर्वी टेलिव्हिजनवर दाक्षिणात्य चित्रपटांचे डब व्हर्जन प्रसारित करण्याचा ट्रेंड सुरु झाला. त्यानंतर ‘बाहुबली’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर टॉलिवूड हे नाव प्रत्येक भारतीयाच्या लक्षात राहिले. तेलुगू सिनेसृष्टीने आत्तापर्यंत असंख्य दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. सध्या डब होणारे सर्वाधिक चित्रपट हे टॉलिवूडचे असतात.

मेगास्टार चिरंजीवी, प्रभास, रामचरण, अल्लू अर्जुन, महेश बाबू, एनटीआर, नागार्जुना, विजय देवरकोंडा हे साउथ सुपरस्टार्स टॉलिवूडचे प्रातिनिधित्त्व करतात. या इंडस्ट्रीमध्ये अनेक नामवंत दिग्दर्शक, लेखक, अभिनेते-अभिनेत्री, निर्माते होऊन गेले आहेत. ‘बाहुबली’, ‘मख्खी’, ‘आरआरआर’ असे तगडे चित्रपट बनवणारे एस.एस.राजामौली देखील टॉलिवूडचे आहेत.
Read More

टॉलिवूड News

allu arjun movie
अल्लू अर्जुन दिसणार ‘कबीर सिंग’च्या दिग्दर्शकाच्या आगामी चित्रपटात! निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा; नाव मात्र गुलदस्त्यात

सोशल मीडियावर फोटो शेअर करत या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली.

Hania Aamir Dance On Naatu Naatu Song
आरारारारा खतरनाक! पाकिस्तानी अभिनेत्री RRR च्या ‘नाटू नाटू’ गाण्यावर थिरकली, Video पाहून नजर हटणार नाही

पाकिस्तानी अभिनेत्रीने पायात घातलेले शूज या डान्सच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत, पाहा व्हायरल व्हिडीओ.

taraka ratna
Taraka Ratna: तेलुगु देसम पक्षाचे नेते आणि टॉलिवूड अभिनेते तारक रत्न यांचे निधन, वयाच्या ३९ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

तारक रत्न हे अभिनेते आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी.रामा राव यांचे नातू आहेत. सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर त्यांचा भाऊ आहे.

yash
ट्रॅफिकमध्ये अडकल्याने संतापलेल्या यशने बंदूक काढली अन्…; ‘केजीएफ’ फेम अभिनेत्याने सांगितला किस्सा

या चित्रपटातील ‘रॉकी भाई’ या त्याच्या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.

ss rajamouli in tiff
प्रतिष्ठित टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये एस.एस. राजामौलींचे जंगी स्वागत; व्हिडीओ व्हायरल

‘टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’चे आमंत्रण एस.एस.राजामौलींना देण्यात आले होते.

vikram-1200
कमल हासन यांच्यानंतर ‘हा’ दाक्षिणात्य अभिनेता साकारणार तब्बल २५ भूमिका

चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जवळ आल्याने निर्मात्यांनी अखेर ट्रेलर प्रदर्शित केला आहे.

former vice president vaikaiah naidu praises mrunal thakur sita ramam movie
मृणाल ठाकूरच्या ‘सिता रामम्’चं माजी उपराष्ट्रपतींकडून कौतुक, व्यंकय्या नायडू म्हणाले “प्रत्येकाने एकदा तरी…”

‘सिता रामम्’ चित्रपटातून मृणालने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.

1770
बहुचर्चित ‘१७७०’ चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

गेल्या काही वर्षात कादंबरी, पुस्तकं, आत्मचरित्र यांचा आधार घेऊन अनेक चित्रपट तयार झाले. त्यातील बहुतांश चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई…

NTR 31
ज्युनियर एनटीआरच्या आगामी ‘एनटीआर-31’बद्दल मोठी अपडेट, येणार ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

 या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. दिग्दर्शक प्रशांत नील यांनी या चित्रपटाबद्दल एक नवीन माहिती शेअर केली आहे.

suriya, tollywood,
फॅनच्या मृत्यूची बातमी समजताच अभिनेता सुर्या पोहोचला त्याच्या घरी, कुटुंबाला मदत करण्याचे दिले आश्वासन!

सुर्याने चाहत्याच्या घरी जाऊन कुटुंबीयांची सांत्वना केली.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

टॉलिवूड Photos

harish kalyan wedding feature
15 Photos
सप्तपदी ते रिसेप्शन, दाक्षिणात्य अभिनेता हरिश कल्याण-नर्मदा उदयकुमार यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो पाहिलात का?

२०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘काधली’ चित्रपटातून त्याला खरी ओळख मिळाली.

View Photos
27 Photos
Photos : दाक्षिणात्य अभिनेत्यांच्या मानधनापुढे बॉलिवूडही फिके; कोणी घेतं १०० कोटी तर कोणी…

अभिनय आणि स्टालने प्रेक्षकांना भुरळ पडणाऱ्या या दाक्षिणात्य कलाकारांनी मानधनाच्या बाबतीत बॉलिवूडमधील सुपरस्टार्सलाही मागे टाकलं आहे.

View Photos

संबंधित बातम्या