‘पुष्पा’, ‘कांतारा’, ‘केजीएफ’ या चित्रपटांनी मागच्यावर्षी बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. ‘केजीएफ’ फेम अभिनेता यश याला या चित्रपटामुळे एक वेगळी ओळख मिळाली आहे. या चित्रपटातील ‘रॉकी भाई’ या त्याच्या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. त्याचे जगभरात करोडो चाहते आहेत. आज यशचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त केजीएफच्या निर्मात्यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘केजीएफ’ चित्रपटाचा पहिला भाग २०१८ साली प्रदर्शित झाला होता तर दुसरा भाग मागच्या वर्षी प्रदर्शित झाला. निर्मात्यांनी तिसऱ्या भागाची हिंट दिली आहे. मात्र चाहत्यांना हा या चित्रपटाची पाहावी लागणार आहे. कारण या चित्रपटाचे चित्रीकरण २०२५ साली सुरु करण्यात येणार आहे. सध्या या चित्रपटाच्या कथेवर काम सुरु आहे. चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या होम्बाळे प्रॉडक्शनने ट्वीट करत माहिती दिली.

‘केजीएफ’ हा मूळ कन्नड चित्रपट असून तो कोळसा माफियांवर आधारित चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत निल यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती होम्बाळे प्रॉडक्शनने केली होती. या चित्रपटामुळे अभिनेता यश प्रसिद्धीच्या झोतात आला, विशेष म्हणजे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात रविना टंडन, संजय दत्तसारखे बॉलिवूड कलाकार होते. प्रेक्षकांना आता तिसऱ्या भागाची उत्सुकता लागली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kgf makers announced third part of film shooting begins from 2025 spg