‘मोहब्बते’ या चित्रपटातून प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री किम शर्मा आता चित्रपटात आणि मालिकेत दिसत नसली तरी ती खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. कधी काळी माजी क्रिकेटपटू युवराज सिंग सोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे किम चर्चेत आली होती. तर आता किम टेनिसपटू लिएंडर पेससोबत गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचे दिसले आहे. लिएंडरचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यांचे हे फोटो पाहिल्यानंतर ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
गोव्यातील एका हॉटेलमध्ये जेवण करतानाचे लिएंडर आणि किमचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ते दोघे टेबलवर असून जेवणाचा आनंद घेताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत ते दोघे ही पोज देताना दिसत आहेत. किमने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि शॉर्टस परिधान केली आहे. तर, लिएंडरने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि शॉर्टस परिधान केली आहे.
आणखी वाचा : ‘तुला लाज वाटायली हवी, तू मुस्लीम आहेस’, कामाख्या देवीचे दर्शन घेतल्याने सारा झाली ट्रोल
आणखी वाचा : ‘मुस्लीम आहेस तू’, या आधी देखील हिंदू मंदिरात गेल्यामुळे सारा अली खान झाली होती ट्रोल
काही दिवसांपूर्वी देखील या दोघांना एकाच ठिकाणी अनेकांनी पाहिले होते. मात्र, वेगवेगळ्या वेळी पाहिलं होतं. आता गोव्यात त्यांना एकत्र पाहिल्यानंतर या चर्चांना उधाण आलं आहे. लिएंडर याधी मॉडेल रिया पिल्लाईसोबत रिलेशनशिप मध्ये होता. त्या दोघांची एक मुलगी देखील आहे. तर किम या आधी अभिनेता हर्षवर्धन राणेसोबत रिलेशनमध्ये होती.