‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री शिखा सिंगने गेल्यावर्षी मुलीला जन्म दिल्यानंतर मालिकेतून ब्रेक घेतला आहे. असं असलं तरी शिखा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. आपल्या मुलीसोबतचे तसचं कुटुंबियांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र नुकत्याच शेअर केलेल्या काही फोटोंमुळे शिखा चांगलीच चर्चेत आली आहे. या फोटोमुळे शिखा ट्रोलदेखील झालीय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिखा सिंगने काही दिवसांपूर्वीच स्तनपान करतानाचा एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता शिखाने एक न्यूड फोटो शेअर केल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय. शिखाने बेडवरील एक फोटो शेअर केलाय. यात शिखाने अंगावर एकही वस्त्र परिधान केलेलं नाही. तिने एक उशी पकडली आहे. तर डार्क लिपस्टिक आणि मोकळे केस असा शिखाचा बोल्ड लूक या फोटोत पाहायला मिळतोय.  शिखाच्या या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.

हे देखील वाचा: ‘मिशन इम्पॉसिबल’ सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार अभिनेत्री तापसी पन्नू

शिखाच्या या फोटोवर एक नेटकरी म्हणाला, “मॅडम तुमचे कपडे कुठे गेले” तर दुसरा युजर म्हणाला, “हे ठिक नाही.” आणखी एक युजर शिखाला म्हणाला, “तुझ्या कडून अशी अपेक्षा नव्हती.”

या आधी काही दिवसांपूर्वीच शिखाने स्तनपानाचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यात शिखाने समाजात स्तनापानाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनावर भाष्य केलं होतं. या पोस्टमुळे शिखाचं अनेक नेटकऱ्यांनी कौतुक केलं होतं. मात्र त्यानंतर शिखाचं न्यूड फोटो शेअर करणं नेटकऱ्यांना काही आवडलेलं दिसत नाही.

शिखाला एकता कपूरच्या ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. २०२० सालामध्ये शिखाने मुलीला जन्म दिल्याने तिने मालिकेतून ब्रेक घेतला. त्यानंतर शिखाचे अनेक चाहते ती मालिकेत परतण्याची वाट पाहत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kumkum bhagya fame actress shikha singh troll after posting her nude and breastfeeding photo on social media kpw