“तू या क्षणी जिथे असशील तिथे…”, समीर चौगुलेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

नुकतंच त्यांनी मातृदिनाच्या निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली होती.

“तू या क्षणी जिथे असशील तिथे…”, समीर चौगुलेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. जीवनात कितीही टेन्शन, ताण असला तरीदेखील सारं काही ठाराविक काळासाठी विसरायला लावणारा कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाने विशेष ओळख निर्माण केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून समीर चौगुलेला ओळखले जाते. समीर चौगुले हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. ते नेहमी सोशल मीडियावर विविध पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच त्यांनी मातृदिनाच्या निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली होती.

समीर चौगुलेने इन्स्टाग्रामवर मातृदिनानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली होती. त्यासोबत त्यांनी त्यांच्या आईचा एक जुना फोटो शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेला हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट स्वरुपातील आहे. या फोटोला त्यांनी भावूक कॅप्शन दिले आहे.

‘धर्मवीर’ चित्रपटाचा नवा विक्रम, आशियातील सर्वात मोठ्या होर्डिंगवर भव्य पोस्टर झळकल्याचा व्हिडीओ व्हायरल

“आज तू असतीस तर?” हा प्रश्न कधी ही मन हळव करतो ग….एकांतात खूप काही बोलायचं असत ….कुशीत शिरून जग विसरायचं असत पण …..तू या क्षणी जिथे असशील तिथे …तुला मातृदिनाच्या शुभेच्छा आणि खूप प्रेम……, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रियांका चोप्रा-निक जोनसची लेक १०० दिवसांनी परतली घरी, फोटो शेअर करत म्हणाली “आमचे बाळ…”

समीर चौगुलेने शेअर केलेला ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांच्या कमेंट पाहायला मिळत आहेत. मला वाटतं की प्रत्येक वेळेस लेकरं भाग्यवान नसतात,,,,आई वडील पण भाग्यवान असतात ज्यांच्या उदरी तुझ्या सारखा कलाकार जन्मास आला, अशी कमेंट एका व्यक्तीने केली आहे. तर अनेकांनी त्यांना मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सैफ अली खानचा लेक सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीला करतोय डेट? व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
फोटो गॅलरी