सलमान खानच्या ‘दबंग ३’ या चित्रपटातून निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच सई चर्चेत आहे. पण यामध्ये सईसोबतच तिचे आई-वडिलसुद्धा भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे ‘दबंग ३’च्या निमित्ताने मांजरेकर कुटुंब एकत्र ऑनस्क्रीन झळकणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महेश मांजरेकर यांची पत्नी मेधा या चित्रपटातसुद्धा त्यांच्या पत्नीचीच भूमिका साकारणार आहेत. तर सई ही सलमानच्या प्रेयसीच्या भूमिकेत आहे. याबद्दल ती म्हणाली, “शूटिंगदरम्यान आई आणि बाबा दोघंही सेटवर असल्याने माझ्यासाठी आनंदाचं वातावरण होतं. एका सीनमध्ये आम्ही तिघं एकत्र झळकणार आहोत. पदार्पणाच्या चित्रपटात असा योगायोग मिळणं म्हणजे माझं भाग्यच आहे.” चित्रपटात महेश मांजरेकर यांच्या भूमिकेचं नाव हरिया असं आहे. त्यांच्या पत्नीच्या भूमिकेसाठी मेधा मांजरेकर यांना घेण्याचा सल्ला खुद्द सलमाननेच दिला.

आणखी वाचा : ‘कल हो ना हो’मधील बालकलाकार आता असा दिसतो, पाहा फोटो..

सई तिच्या पहिल्या चित्रपटासाठी फारच उत्सुक असून सोशल मीडियावर ती यासंदर्भातले अपडेट्स पोस्ट करत असते. प्रभुदेवा दिग्दर्शित हा चित्रपट २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manjrekar family reunion in dabangg 3 mahesh manjrekar medha manjrekar and saiee manjrekar ssv