अभिनेता मनोज बाजपेयी सध्या त्यांच्या ‘भैय्या जी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. २४ मे रोजी त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यादरम्यान ते विविध वृत्तवाहिन्या आणि युट्यूब चॅनेल्सला मुलाखती देत आहेत. अशाच एका मुलाखतीदरम्यान त्यांना मुंबई आवडते की दिल्ली? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं.

हेही वाचा – Video: एक बार देख लीजिए…; जुईली जोगळेकरने गायलं ‘हीरामंडी’तील लोकप्रिय गाणं, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

रियल हिट यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मनोज बाजपेयी म्हणाले, “दिल्लीतील लोक म्हणतात, ‘माझी ऑडी दुरुस्त करायची आहे’, ‘मी मर्सिडीजने येतोय’. ते लोक कधीही कार असा शब्द वापरत नाहीत. मात्र, मुंबईतील लोकांना सर्व प्रकारच्या गाड्या पाहण्याची सवय झाली आहे. मुंबईत एखाद्याने म्हटलं की माझ्याकडे मर्सिडीज आहे, तर दुसरा माझ्याकडे मासेराटी असं म्हणतो.”

“दिल्ली खूप सुंदर मात्र, मुंबईतील लोक त्यापेक्षा चांगले”

“मुंबईत मर्सिडीज किंवा मासेराटी चालवणारे लोकही ऑटोने प्रवास करतात. त्यांना त्याची लाज वाटत नाही. कारण त्यांना माहिती आहे की, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा हा सर्वात चांगला पर्याय आहे. याबाबतीत मुंबई दिल्लीपेक्षा उजवी आहे. यावेळी दोन्ही शहरात राहणाऱ्या लोकांबाबत विचारलं असता, दिल्ली खूप सुंदर आहे. मात्र, मुंबईतील लोक त्यापेक्षा चांगले आहेत”, असं ते म्हणाले.

हेही वाचा – “माझ्या मुलीचा जन्म होणार होता, तेव्हा…”, ‘गजनी’ फेम असिनच्या पतीचं बोलणं ऐकून अक्षय कुमार झाला भावुक; म्हणाला…

मनोज बायपेयी यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ते ‘किलर सूप’ या वेब सीरिजमध्ये झळकले होते. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजमध्ये त्यांची दुहेरी भूमिका होती. यामध्ये त्यांच्याबरोबर कोंकणा सेन शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत होती. त्यांच्या या वेब सीरिजची खूप चर्चा होतील. यातील त्यांच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. सध्या ते ‘भैय्याजी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. त्यांच्या ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजच्या तिसऱ्या पर्वाचं शूटिंग सुरू आहे. दोन पर्व सुपरहिट झाल्यानंतर या सीरिजच्या तिसऱ्या पर्वात नेमकी कोणती कथा पाहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. चाहते आतुरतेने त्यांच्या या लोकप्रिय सीरिजच्या तिसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. या सीरिजमध्ये मनोज बाजपेयी यांच्यासह प्रियामणी, शरद केळकर, शारिब हाश्मी हे कलाकारही आहेत.