मनोरंजनाचा डबल डोस घेऊन प्रदर्शित झालेल्या ‘दे धक्का २’ (De Dhakka 2) चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने ‘दे धक्का २’च्या टीमने लोकसत्ता ऑनलाईनच्या ‘डिजीटल अड्डा’ला हजेरी लावली. यावेळी अभिनेते मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, गौरी इंगवले, सक्षम कुलकर्णी यांनी चित्रपटाबद्दल मनसोक्त गप्पा मारल्या. यादरम्यान मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउंडेशने चिपळूणमध्ये केलेलं काम आणि यंदा तिथे पूर का आला नाही? याबाबत सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – Photos : १९व्या वर्षी लग्न अन् ३२ वर्षांचा सुखी संसार, मृणाल कुलकर्णी यांचे पतीबरोबरचे सर्वात सुंदर फोटो

मकरंद अनासपुरे म्हणाले, “नाम फाउंडेशनचं काम खूप मोठं आहे. यावर्षी चिपळूणमध्ये पूर आलेला नाही. कारण तिथे नाम फाउंडेशनने लोकसहभागातून आणि प्रशासनाच्या मदतीने खूप मोठं काम केलं. विशिष्ठी आणि शिव नदीचा गाळ काढून आम्ही या नद्यांचं रुंदीकरण केलं. म्हणून चिपळूणला पूराचा धोका उद्भवला नाही. गेल्यावर्षी चिपळूमध्ये जेव्हा पूर आला तेव्हा साखरप्याला पूराचा फटका बसला नाही. दरवर्षी साखरप्याची बाजारपेठ पूराच्या पाण्यामुळे भरते. पण गेल्यावर्षी आलेल्या पूरापासून साखरप्याची बाजारपेठ सुरक्षित कशी? अशी जेव्हा चर्चा सुरु झाली तेव्हा नाम फाऊंडेशनचं नाव समोर आलं.”

“नाम फाऊंडेशनने केलेल्या कामामुळे साखरप्याला पूर आला नाही हे कोकणामध्ये सगळ्यांना कळालं. त्यानंतर कोकण जलपरिषदेने नाम फाउंडेशनला आमंत्रित केलं. तिथे नाना पाटेकर यांनी असं सांगितलं की, “पूर आल्यानंतर आपण जी मदत करतो त्याला काहीच अर्थ नाही. पण पूरच येऊ नये म्हणून काही मदत करू शकतो का? असं नाना पाटेकर यांनी विचारलं. त्यानंतर नाम फाउंडेशनने यामध्ये सहभाग घेतला. जवळपास सहा महिने चिपळूणमध्ये काम केलं. आता चिपळूणमध्ये पूर परिस्थिती नाही.”

नाम फाउंडेशनच्या एकूणच कामाबाबत मकरंद अनासपुरे म्हणाले, “लोकसहभाग आणि प्रशासनाची मदत यामधून हे काम होतं म्हणून त्याची कधी चर्चा केली जात नाही. सात वर्षामध्ये नाम फाउंडेशनने महाराष्ट्रभरात जवळपास सहा टीएमसी इतकं काम केलं आहे. माणसांनी माणसांसाठी चालवलेली माणूसकीची चळवळ अशी या कामामागची भूमिका आहे. या कामासाठी आम्ही कोणतंच बक्षिस घेणार नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही ही स्पष्ट भूमिका होती. या कामामागे लोकांना वाटत होतं की यांचं काही उद्दीष्ट असेल तसा विचार करणं स्वाभाविक आहे. पण त्यामागे कोणतीही राजकीय भूमिका नाही हे आता लोकांनाही कळलं आहे.” नाम फाउंडेशन महाराष्ट्रभर करत असलेलं काम खरंच कौतुकास्पद आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor makrand anaspure talk about naam foundation and opens up about naam foundation see details kmd
First published on: 10-08-2022 at 18:34 IST