नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच अभिनेत्री केतकी चितळे चर्चेत आली आहे. सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आलेल्या केतकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी तिला चांगलीच खरी खोटी सुनावली आहे. आता केतकीने या सर्व प्रकरणावर सडेतोड उत्तर दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केतकी चितळेने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रात्री १२ च्या सुमारास इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत तिने तिच्या हातावर गोंदलेला एक टॅटू शेअर केला होता. त्याबरोबरच तिच्या हातात दारुचा एक ग्लासही पाहायला मिळत होता. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये असंही लिहिलं की, “मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ लेकिन इसका मतलब यह नहीं की बाकी सब १००% गलत है।”. तिच्या हातातील दारुचा ग्लास पाहून नेटकरी संतापले आहेत. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
आणखी वाचा : केतकी चितळेने हातावर गोंदलेल्या टॅटूचा संबंध थेट शरद पवारांशी, अर्थ सांगत म्हणाली “ते अंक म्हणजे…”

केतकीचा हा व्हिडीओ पाहून एक नेटकरी म्हणाला, “वाह दीदी… लोकांना सांगायचं इंग्रजी परंपरा पाळू नका… आणि आपण ढोसायचं..”! त्याची ही कमेंट पाहून केतकी चितळे चांगलीच संतापली. यावर तिने सडेतोड शब्दात उत्तर दिले आहे.

“मी कधी म्हणाले इंग्रजी परंपरा पाळू नका?
२. सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात दारू आहे. आमचे देव ही दारू पितात. काली मातेला तर दारूचे नैवेद्य असते. तसेच काही शंकराच्या मंदिरात ही.
३. स्वतः ची संस्कृती शिका, हे मी नेहमी लिहिते व सांगते. फरक शिका”, असे केतकी चितळेने म्हटले आहे. त्यावर त्या नेटकऱ्याने धन्यवाद असे म्हटले आहे.

तर एकाने “तुम्ही काही ही करा.. दारू प्या नाहीतर.. फादरांच्या धर्मात जा पण त्याचे असे जाहीर प्रदर्शन करून हा कू संदेश समाजात फैलावू नका.. लोकानी आपला आदर्श घ्यायला सुरु केला होता.. पण त्यावर तुम्ही दारू ओतली.. जरा प्रसिद्ध झाले की Tv सिनेमा वाल्या लोकांना हे इसाई धर्म प्रचारक लगेंच गाठतात.. आणी मग फंडिंग टूलकीट ने अगदी अशाच पोस्ट टाकल्या जातात.. त्यात एक वाक्य सुरुवातीला हमखास असते.. ख्रिस्ती टूलकीट ओळखू येऊ नये म्हणून.. ते असे ” मी कट्टर हिंदू आहे.. पण हे देखील(इसाई संस्कार )चांगले आहे.. ” बरोबर? लगेंच Unfollow करीत आहे धन्यवाद.”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

त्यावर केतकीने “अनफॉलो केल्याबद्दल धन्यवाद, पोस्ट न कळणारे महामूर्ख लोकं नकोच फॉलोअर्स म्हणून”, असे म्हटले आहे.

आणखी वाचा : “उर्फी जावेद रुपी स्त्री देहाचा बाजार रोखा” चित्रा वाघ यांचे मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र, म्हणाल्या “चार भिंतीच्या आड…”

दरम्यान केतकी चितळेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत तिला ट्रोल केले आहे. तर काहींनी तिला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress ketaki chitale controversial reply to trollers said our gods drink liquor nrp