आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. सध्या ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानसी नाईक ही लवकरच तिचा पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार आहे. काही दिवसांपूर्वीच मानसीने घटस्फोटासाठी अर्ज दिल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ती सातत्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत आहे, नुकताच तिने वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मानसी नाईक ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती कायमच इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी गाण्याबद्दल, चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर करताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या खासगी आयुष्याशी निगडीत भावूक पोस्ट करताना दिसत आहे. नुकताच जिममधला वर्कआऊट करतानाच व्हिडीओ तिने शेअर केला आहे, ज्यावर तिने कॅप्शन दिला आहे “कधीकाळी आईच्या मांडीवर ‘डोल ठेवून रडले ते आता रडताना बाथरूम मध्ये नळ सोडून रडते, आता पश्चाताप नंतर करा किंवा स्वतःचा विकास करा, कधी हार मानू नका,” असं म्हणत तिने आपल्या भावना शेअर केल्या आहेत.

दरम्यान मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. पण त्यानंतर त्या दोघांनीही इन्स्टाग्रामवरून एकमेकांबरोबरचे फोटो डिलीट केले होते. त्यामुळे दोघांच्याही नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress manasi naik shared work out video became viral spg