मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसते. नुकतंच प्राजक्ताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती तिच्या भाच्यांसोबत उन्हाळ्याची सुट्टी आणि आंबे खातानाची मजा अनुभवताना दिसत आहे.

प्राजक्ताने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिच्या दोन भाच्या आंबे खाताना दिसत आहेत. तर दुसरीकडे कोणतरी त्यांना आंबे कापून देताना दिसत आहे. त्यावर ती एका भाचीला विचारते की तुला अजून काय हवं आहे. तर ती आंबा असे उत्तर देते. त्यावर प्राजक्ता पुन्हा विचारते तुला आंबा आवडतो का? त्यावर ती म्हणते की खूप आवडतो. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओला तिने हटके कॅप्शन ही दिले आहे.

विश्लेषण : ‘शेर शिवराज’ ठरला मेटाव्हर्सद्वारे लाँच होणारा पहिलाच मराठी चित्रपट, मेटाव्हर्स म्हणजे नेमके काय? जाणून घ्या

“सहकुटूंब सहपरिवार, स्वतःच्या बागेत बसून, ह्या पिल्लांना (भाच्यांना), रसाळ “हापूस” आंब्यांवर ताव मारताना बघणं आणि स्वतःही नंतर आडवा हात मारणं… म्हणजे..सुख म्हणजे नक्की काय असतं ; ह्याचं उत्तर सापडणं आहे….#उन्हाळ्याचीसुटी चा feel, #माळ्यांचीबाग, #माळ्यांच्यापोरी आणि त्यांच #आम्रप्रेम #पुणे” असे कॅप्शन प्राजक्ताने दिले आहे. प्राजक्ताची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

“हवं तर माझ्याकडून पैसे घ्या, पण माझ्या मुलाला…”; अभिनेते अनिल कपूर यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

दरम्यान प्राजक्ता ही ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचली. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं. या मालिकांपासून सुरु झालेला प्राजक्ताचा प्रवास चित्रपटांपर्यंत येऊन पोहोचला आहे. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.