‘झी मराठी’वरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. फक्त सिनेसृष्टीत नव्हे तर राजकीय पातळीवरही हा कार्यक्रम चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक कलाकारासह राजकीय क्षेत्रातील आघाडीच्या महिला नेत्यांनी हजेरी लावली आहे. त्यानंतर आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सहभागी झाली होती. यावेळी तिने मराठी सिनेसृष्टी, तिचे लग्न आणि इतर गोष्टींबद्दल भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या अनेक कलाकारांना विविध प्रश्न विचारले जातात. त्यावर त्यांना उत्तर द्यावी लागतात. या कार्यक्रमादरम्यान सहभागी होणाऱ्या कलाकारांना सहप्रवाशी म्हणून एक फोटो दाखवला जातो. यावेळी सोनाली कुलकर्णीला अमृता खानविलकरचा फोटो दाखवण्यात आला. त्यावर सोनालीने स्पष्टपणे भाष्य केले आहे.

आणखी वाचा : “मोठ्या नट्या…” उषा नाडकर्णींनी नवोदित येणाऱ्या अभिनेत्रींचे टोचले कान

सोनाली कुलकर्णी अमृता खानविलकरबद्दल नेमकं काय म्हणाली?

“मला माहिती होतं की तुम्ही हा फोटो लावणार आहात. कारण अमृतानेच मागणी केली होती. तुझ्या मागणीला झी मराठीने दाद दिली आहे. आपला प्रवास एकत्र सुरु झाला. आपलं काही तरी कनेक्शन आहे. माहिती नाही काय कसं पण नशिबाने आपल्याला कायम एकमेकांसमोर आणलं आहे. आपली मैत्री कधीच झाली नाही. कारण आपण कधीच एकत्र काम केलं नाही.

माझी मैत्री मी ज्या ज्या लोकांसोबत काम करते त्यांच्याशी होते. पण आपण कधीही वेळ घालवला नाही, त्यामुळे आपली मैत्री कधीही झाली नाही. तरीही आपल्याला एकमेकींबद्दल खूप माहिती आहे. आपण एकमेकींना खूप समजून घेऊ शकतो. मला माहितीये तुलाही तेच वाटतं.

नटरंग चित्रपटात आपली गाणी एकत्र होती. पण आपण एकत्र काम केले नाही. नटरंगचे यश आपण शेअर केलं, असं म्हणायला हरकत नाही. त्यावेळी लोकांनी आपल्यात शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तुझ्या आणि माझ्यात कधीही असं काही, कधीही अडचण नव्हती. दोन अभिनेत्री मैत्रीण असू शकत नाही हे लोकांना ऐकायला आवडेल. पण आम्ही एकत्र काम केलं असतं तर नक्कीच मैत्री झाली असती. आमच्यात वैरही नाही.

पण लोकांना दोन यशस्वी असलेल्यांना एकत्र बघायला आवडत नाही. तसं झालं असावं. काही समज, गैरसमज नक्कीच झाले असतील. पण इतक्या वर्षानंतर एकमेकांना आपण समजून घेऊ शकतो. तू जो स्ट्रगल केलास मी तो केला असं म्हणणार नाही. कारण प्रत्येकाचा स्ट्रगल वेगळा असतो. तसाच संघर्ष मी केलाय, तो तुलाही माहिती आहे. त्याबद्दल मला नितांत आदर आहे. आपण एकत्र काम केलं तर आपल्यात नक्की मैत्री होईल, तोपर्यंत त्याची वाट पाहू”, असे सोनाली कुलकर्णी म्हणाली.

आणखी वाचा : सोनाली कुलकर्णी मालदिवमध्ये राहत असलेल्या रिसॉर्टचे एक दिवसाचे भाडे माहितेय का?

दरम्यान सोनाली कुलकर्णीचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. फक्त अमृता खानविलकर नव्हे तर तिच्या एका मैत्रीणीचा फोटो दाखवल्यावर तिला रडू कोसळले. त्यासोबतच सोनालीने सिद्धार्थ जाधवचा एक किस्साही यावेळी सांगितला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress sonalee kulkarni talk about amruta khanvilkar in bus bai bus show nrp