केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले आहे. ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सहा महिलांच्या आयुष्यावर आधारित आहे. महिलांच्या आयुष्यातील दैनंदिन समस्या मोठ्या पडद्यावर मांडल्याबद्दल सध्या केदार शिंदे यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

हेही वाचा : पुरंदरचा रणसंग्राम लवकरच मोठ्या पडद्यावर! ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका, पोस्टर प्रदर्शित

‘बाईपण भारी देवा’ मध्ये केदार शिंदेंनी ज्याप्रकारे ६ महिलांची गोष्ट दाखवली आहे. अगदी त्याचप्रमाणे त्यांच्या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटात सुद्धा मुख्य नायकाला महिलांच्या मनातील सर्व गोष्टी ऐकू येतात, त्यानंतर तो प्रत्येक महिलेच्या भावना कशाप्रकारे समजून घेतो हे दाखवण्यात आले होते. सध्या सोशल मीडियावर केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘अगं बाई अरेच्चा’ या दोन्ही चित्रपटांचे कौतुक करण्यात येत आहे. दोन्ही चित्रपटांचे आशय, कथानक वेगवेगळे असले तरीही प्रत्येक महिलेला हे दोन्ही चित्रपट अगदी जवळचे वाटले.

हेही वाचा : “दाढ काढलीस?”, नेटकऱ्याच्या कमेंटला सिद्धार्थ चांदेकरने दिले भन्नाट उत्तर; म्हणाला, “अहो लय…”

‘अगं बाई अरेच्चा’ मध्ये अभिनेते संजय नार्वेकर यांनी मुख्य भूमिका साकारली होती आणि त्यांना महिलांच्या मनातील सर्व गोष्टी ऐकू येत असतात. यासंदर्भात दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर चाहत्याने बनवलेला एक खास फोटो शेअर केला आहे. यावर लिहिले आहे की, “‘अगं बाई अरेच्चा’ आणि ‘बाईपण भारी देवा’ हे दोन्ही चित्रपट बघितल्यावर एक जाणवलं या माणसापेक्षाही ( संजय नार्वेकर) या माणसाला ( केदार शिंदे) बायकांच्या मनातलं जास्त ऐकू येतं.”

हेही वाचा : “तुम्ही खाल्लेला विचित्र पदार्थ कोणता?”, अतुल कुलकर्णी म्हणाले, “बेडकाचे पाय अन्…”

केदार शिंदेंनी हा फोटो शेअर करत याला “जबाबदारी…#बाईपण भारी देवा” असे कॅप्शन दिले आहे. या फोटोवर एका युजरने कमेंट करत म्हटले आहे की, “संजय नार्वेकर यांना ही शक्ती केदार शिंदेनीच दिली होती.” तर, दुसऱ्या एका युजरने कमेंटमध्ये “हो हे खरं आहे…मी स्वतः रसिकांकडून ऐकलंय स्त्री कथानक केदार शिंदे यांच्यासाठी लकी आहे.” अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी केदार शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.