दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल ठरत आहे. मुंबई, पुणे यांसह सर्वच शहरात हा चित्रपट सुपरहिट झाला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्डही ब्रेक करताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने पहिल्याच वीकएण्डला ६.४५ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यामुळे पहिल्याच आठवड्याअखेरीस सर्वाधिक कमाई करणारा या वर्षातला सुपरहिट मराठी चित्रपट ठरला.
आणखी वाचा : “केसांचा लाल रंग, A अक्षराचे मंगळसूत्र अन्…”, ‘बाईपण भारी देवा’मधील सुचित्रा बांदेकरांच्या लूकची रंगली चर्चा, डिझाईनर म्हणाली…

यानंतर या चित्रपटाने पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस १२.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. आता या चित्रपटाने गेल्या रविवारी विक्रमी कमाई केली आहे. नुकतंच याचे आकडे समोर आले आहेत.

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटान प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारी तब्बल ६.६० कोटींची विक्रमी कमाई केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात इतकी कमाई करणारा ‘बाईपण भारी देवा’ हा पहिलाच चित्रपट आहे. याआधी रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड या चित्रपटाने ५.७० कोटींची कमाई एका दिवसात केली होती. त्यापूर्वी हा रेकॉर्ड सैराटच्या नावे होता. तर या चित्रपटाने दहा दिवसांमध्ये एकूण २६.१९ कोटींचा गल्ला जमवला आहे.

आणखी वाचा : “खरंतर ऐन उन्हाळ्यात चित्रपट प्रदर्शित करायला हवा होता…”, संजय मोने यांची पोस्ट; म्हणाले “नाव ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी…”

आणखी वाचा : “इंग्रज कोकणस्थ ब्राह्मणांना आपली औलाद म्हणून सोडून गेले”, म्हणणाऱ्याला मराठी अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, “ही भाषा…”

या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या मुख्य भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baipan bhari deva marathi movie superhit breaks riteish deshmukh ved film became highest grossing marathi film nrp