११ वर्षांपूर्वी आलेल्या फँड्री चित्रपटातील शालू-जब्याची जोडी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित हा चित्रपट खूप गाजला होता. चित्रपटाने चांगली कमाई केली होती आणि या चित्रपटासाठी त्यांचं खूप कौतुकही झालं होतं. या चित्रपटात जब्या व शालूची भूमिका करणारे सोमनाथ अवघाडे व राजेश्वरी खरात हे कलाकार मोठे झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजेश्वरी खरात सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती इन्स्टाग्रामवर फोटो व व्हिडीओ रील्स शेअर करत असते. आता तिने जब्या म्हणजेच सोमनाथबरोबरचा एक फोटो शेअर करत ‘कशी काय मग जोडी’ असं कॅप्शन दिलं आहे. तसेच तिने शालू जब्या फॉरेव्हर असे हॅशटॅग दिले आहेत. तिच्या या फोटोवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

‘पक पक पकाक’ मधली ‘साळू’ सध्या काय करते, कशी दिसते? जाणून घ्या

राजेश्वरीने शेअर केलेल्या फोटोवर नेटकरी खूप कमेंट्स करत आहेत. ‘लग्न करून टाका मग मस्त आहे जोडी’, ‘काळी चिमणी घावली जब्याला’, ‘फँड्रीचा सिक्वेल यायला पाहिजे’, ‘नागराज सरने बनादी जोडी’, ‘तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला’, अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.

राजेश्वरी खरातच्या पोस्टवरील कमेंट्स
राजेश्वरी खरातच्या पोस्टवरील कमेंट्स

राजेश्वरीने केलेला हा फोटो खूप चर्चेत आहे. दोघेही या फोटोत खूप छान दिसत आहेत. राजेश्वरीने शेअर केलेल्या फोटोने चाहत्यांना परत एकदा फँड्री सिनेमातील शालू-जब्याची जोडी आठवण करून दिली.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fandry fame shalu aka rajeshwari kharat shares photo with jabya somnath awaghade netizens comments viral hrc