मराठी सिनेसृष्टीत स्वत:च्या दमदार अभिनयाने चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणून भरत जाधव यांना ओळखले जाते. भरत जाधव यांचा आज वाढदिवस आहे. ‘जत्रा’, ‘साडे माडे तीन’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘पछाडलेला’ अशा एक सो एक चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारत त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेने भरत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौरव मोरेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना भरत जाधव यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : “माझा गोड उमेश”, नवऱ्याच्या वाढदिवशी प्रिया बापटची रोमँटिक पोस्ट; म्हणाली…

“तुमचा हात पाठीवर असण ह्यापेक्षा मोठा आशीर्वाद नाही….सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”, असे गौरव मोरेने म्हटले आहे.

आणखी वाचा : Video : याला म्हणतात माणुसकी! अंशुमन विचारेचा महागडा फोन रिक्षा चालकाने केला परत! व्हिडीओ व्हायरल

दरम्यान गौरवच्या या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. त्याबरोबरच अनेक चाहते कमेंट करत भरत जाधव यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. तसेच सध्या गौरव हा लंडन मिसळ या चित्रपटात झळकत आहे. यात त्याने भरत जाधव यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actor gaurav more birthday wish to actor bharat jadhav special post nrp