मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. संतोषने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. संतोष सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. निरनिराळे व्हिडीओ, फोटो पोस्ट करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. नुकतेच संतोषने आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टबरोबर त्याने दिलेल्या कॅप्शननेही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संतोषने आई-वडिलांचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत त्याने लिहिले, “काल आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि आज मी post share करतोय, कारण मला हवा तसा फोटो सापडत नव्हता आणि आज सापडला आणि त्यांचा हा फोटो मला खूप आवडलाय. आईने काल बाबांना smart phone gift केला आणि ती त्यांना तो कसा वापरायचा हे शिकवत होती आणि बाबा आईचं नीट लक्ष देऊन ऎकत होते.”

संतोषने पुढे लिहिले, “अगदी असंच ते लग्न झाल्यापासून आईचच लक्ष देवून ऎकत आले आहेत, म्हणून आजही सुरक्षित आणि उत्तम आयुष्य जगतायत. आईने काल तिची लग्नातली आठवण share केली. तिने सांगितलं, लग्न झाल्यावर सासरी जाताना तिची आई म्हणाली होती, “आता तू आमची राहिली नाहीस; आता तू, तुझा संसार, तू सांभाळ खंबीरपणे.आई-बाबा मला तुमचा खूप अभिमान आहे, तुम्ही दोघांनी करून दाखवलंत; लढलात, पडलात, पुन्हा लढलात, तुम्ही तुमच्या संसारासाठी अगदी आमच्यासकट जे केलं आहे ते खूप अमूल्य आहे आणि तुमच्या प्रेमाची आणि कष्टाची जाण आम्हाला कायम राहो, हाच तुमचा आणि देवाचा आम्हाला आशीर्वाद लाभूदे i love u lottttttt नांदा सौख्यभरे.”

हेही वाचा- आजोबांच्या धाकामुळे माधुरी दीक्षितने शेणाने सारवलेलं अंगण; कोकणातील आठवणी सांगत म्हणाली, “आमच्या गावी…”

संतोषच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास मालिका, नाटक, चित्रपटांमधून संतोषने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आजपर्यंत त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ चित्रपटांमधील त्याची भूमिका चांगलीच गाजली. काही महिन्यांपूर्वीच त्याचा ‘डेट भेट’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्याबरोबर सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहे. तसेच २१ जुलैला प्रदर्शित झालेला ‘MINUS 31’ या हिंदी चित्रपटातही तो झळकला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor santosh juvekar shared special post on his parents wedding anniversary dpj