अभिनेत्री मिताली मयेकर व सिद्धार्थ चांदेकर मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. सिद्धार्थ आणि मिताली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. अनेकदा मितालीला या फोटोंमुळे ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. दरम्यान पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी कपड्यावरुन मितालीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सिद्धार्थने ट्रोलर्संना सडेतोड उत्तर दिले आहे.
नुकतेच सिद्धार्थ व मितालीने एकत्र जाहिरात केली होती. या जाहिरातीचा व्हिडीओ दोघांनीही इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी मितालीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केल्याचे बघायला मिळाले. या व्हिडीओवर एका महिलेने मितालीला बिकिनी घाल अशी कमेंट केली होती. बायकोला बिकीनी घाल असे म्हणणाऱ्या महिलेला सिद्धार्थने सडेतोड उत्तर दिले आहे.
सिद्धार्थने मितालीला ट्रोल करणाऱ्या महिलेला “तुमचे अहो तुम्हाला काय म्हणतात हे ताई इथे सांगू नका”.असे उत्तर दिले आहे. सिद्धार्थच्या या उत्तराची सगळीकडे चर्चा रंगली आहे. अनेकांनी सिद्धार्थच्या या उत्तराने कौतुक केले आहे. काहींनी सिद्धार्थच्या उत्तरावर कडक रिप्लाय, असंच उत्तर दिलं पाहिजे अशा कमेंट केल्या आहेत. या अगोदरही अनेकदा सिद्धार्थने मितालीला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना चांगलचं सुनावले होते.
सिद्धार्थच्या या कामाबद्दल बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वीच त्याचा झिम्मा २ चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. आता सिद्धार्थचा ‘ओले आले’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर नाना पाटेकर, सायली संजीव यांची प्रमुख भूमिका आहे.