मराठी चित्रपटसृष्टील लोकप्रिय गायिका व अभिनेत्री म्हणून केतकी माटेगांवकरला ओळखले जाते. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ केतकी प्रसिद्धीझोतात आली. आपल्या आवाजाबरोबरच केतकीने अभिनय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. सोशल मीडियावर केतकी मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते.
प्रत्येक कलाकाराला दिवस-रात्र एक करुन काम करत असतो. तहान भूक हरपून आपली भूमिका चोख बजावण्याचा प्रयत्न करतात. एवढचं नाही तर शुटिंगच्या ठिकाणी मिळेल ते आणि मिळेल तेव्हा जेवण करुन काम करतात. असाच काहसा प्रकार केतकी माटेगांवकरबरोबर घडला आहे. केतकीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबतह माहिती दिली आहे.
हेही वाचा-
केतकीने पोस्टमध्ये लिहिलं “सुप्रभात. सिल्लोड, छत्रपती संभाजी नगरमध्ये हृषीकेश रानडे व अली हुसैन यांच्याबरोबर पार पडलेल्या कार्यक्रमाचे काही फोटो शेअर करत आहे. यातील प्रत्येक क्षण मजेशीर होता. जरी कार्यक्रम उशिरा सुरु झाला असला तरी मज्जा आली. विमानाच्या वेळांमुळे सलग दोन रात्री झोपले नव्हते. एका गायकाचा किंवा गायिकेचा आवाज चोवीस तास त्यांच्याबरोबर असतो. त्यामुळे त्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण कधी कधी सकाळी ४ वाजता एअरपोर्टवर डोसा खाणं, कार्यक्रमानंतर २.३० वाजता जेवण करणं हे होत राहतं” असं म्हटलं आहे. केतकीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.
केतकीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास आत्तापर्यंत तिने अनेक सुपरहिट चित्रपटांना आपला आवाज दिला आहे. तसेच ‘शाळा’, ‘टाईमपास’, ‘तानी’ चित्रपटांमधील तिची भूमिका चांगलीच गाजली. दरम्यान काही दिवसांपूर्वीच तिचा ‘अंकुश’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला.