मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. मराठीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून तिची खास ओळख आहे. सई ताम्हणकरने मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारत अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. नुकतंच तिने तिच्या पहिल्या चित्रपटाच्या ऑडिशनबद्दल भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सई ताम्हणकरने मराठीसह बॉलिवूडमध्येही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘आयफा’, ‘फिल्मफेअर’ यांसारखे नावाजलेले पुरस्कार तिने पटकावले. रुपेरी पडद्यावर ती साकारत असलेल्या भूमिकांचं विशेष कौतुकही होताना दिसतं. सईने या गोजिरवाण्या घरात, अग्निहोत्र, साथी रे, कस्तुरी यांसारख्या मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या.
आणखी वाचा : “नवीन घर कसं वाटत आहे?” सई ताम्हणकरला चाहत्याचा प्रश्न, फोटो शेअर करत म्हणाली “खूप…”

यानंतर २००८ मध्ये सईने सनई चौघडे या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. नुकतंच इन्स्टाग्रामवर आस्क मी समथिंग या सेशनवेळी तिला विविध प्रश्न विचारण्यात आले. यावेळी “तिला तुझे पहिल्या चित्रपटासाठी ऑडिशन झाले होते का?” असा प्रश्न विचारण्यात आला.

याला तिने व्हिडीओद्वारे उत्तर दिले. “हो मी पहिल्या चित्रपटावेळी नक्कीच ऑडिशन दिली होती. या चित्रपटासाठी एकदा नाही तर चार वेळा ऑडिशन झाली होती”, असे सईने यावेळी म्हटले.

आणखी वाचा : “घरी भाजी न आवडल्याची तक्रार केली, तर…” सई ताम्हणकरने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली…

दरम्यान सई ताम्हणकरने २००७ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केले. या गोजिरवाण्या घरात ही तिची पहिली मालिका होती. सई ताम्हणकरची मुख्य भूमिका असलेला दुनियादारी हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटामुळेच ती प्रसिद्धीझोतात आली. सध्या सई ही तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress sai tamhankar talk about her first movie audition during ask me something nrp