मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक व अभिनेता म्हणून हेमंत ढोमेला ओळखलं जातं. तो कायमच विविध धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’ याशिवाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘फसक्लास दाभाडे’ या सिनेमाला सुद्धा बॉक्स ऑफिसवर भरभरून प्रतिसाद मिळाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेमंत ढोमे अनेकदा सामाजिक व राजकीय परिस्थितीबाबत आपलं मत मांडतो. सध्या हेमंतने शेअर केलेल्या अशाच एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने इतिहासाबद्दल भाष्य केलं आहे. “इतिहासात रमण्यापेक्षा त्यास आदर्श मानून नवा इतिहास रचायचा असतो” असं अभिनेत्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अभिनेत्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

दिग्दर्शक व अभिनेता हेमंत ढोमेची पोस्ट

“इतिहास वाचून…जाणून…त्यातून प्रभावित होऊन नव्या उर्जेने भविष्य घडवायचं असतं! इतिहासात रमण्यापेक्षा त्यास आदर्श मानून नवा इतिहास रचायचा असतो! पण, आपण रमलोय कशात? तुझा इतिहास खरा की माझा? घडायचंय ते घडून गेलंय. पण पुढे काय घडणार आहे किंवा घडवायचं आहे याचा विचार करणारे दुर्मिळ झाले आहेत. बहुधा त्याचमुळे आजकाल समकालीन आदर्श उरलेले नाहीत! आपण जुनेच घासून गुळगुळीत करीत बसलोय! आता भिती एकच…यामुळे नव्या पिढीला जुन्याचा कंटाळा यायला नको!”

हेमंतने ही पोस्ट त्याच्या इन्स्टाग्राम व एक्स अकाऊंटवर शेअर केली आहे. त्याच्या एक्स पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “कोणीतरी हे बोलणं गरजेचं होतं, तुम्ही बोललात आपल्या वैचारिक आणि सामाजिक प्रगल्भतेची जाणीव झाली”, “अगदी बरोबर बोललात पाटील तुम्ही”, “बघतोस काय मुजरा कर सिनेमाचा दुसरा भाग बनवा, लोकांना या गोष्टी समजल्या पाहिजेत” अशा कमेंट्स दिग्दर्शकाच्या पोस्टवर आल्या आहेत.

दरम्यान, हेमंत ढोमेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर त्याने दिग्दर्शित केलेला ‘फसक्लास दाभाडे’ सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाला मराठी प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. बॉक्स ऑफिसवर सुद्धा या ‘फसक्लास दाभाडे’ने चांगलं यश मिळवलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi director hemant dhome post about history grabs attention netizens commented sva 00