स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. रणदीप हुड्डा दिग्दर्शित या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. रणदीपचं दिग्दर्शन, अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाचं पसंतीस पडला आहे. कलाकार मंडळीही सोशल मीडियाद्वारे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाविषयी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच आपल्या चाहत्यांना हा चित्रपट आवर्जुन पाहण्याचे आवाहन करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी गायिका मुग्धा वैशंपायने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाविषयी आपलं मत मांडलं आहे. याआधीही मुग्धा वीर सावरकरांसंबंधित असलेल्या बऱ्याच कार्यक्रमांमध्ये गाताना दिसली आहे. वीर सावरकरांवर आधारित असलेली बरीच गाणी तिने गायली आहेत. ‘अंदमान बोलावतंय’ या टूरला ती नेहमी जात असते. अशी ही लोकप्रिय गायिका ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाविषयी काय म्हणाली? जाणून घ्या…

हेही वाचा – कंगना रणौतला लोकसभा निवडणुकीचं तिकिट मिळताच मराठी अभिनेत्रीने केलं समर्थन, म्हणाली…

इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा फोटो शेअर करत मुग्धाने लिहिलं की, हा चित्रपट बघितला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या तेजस्वी सूर्याचं आयुष्य अवघ्या जगाला कळावं, त्यांनी आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाने आपल्या मातृभूमीसाठी केलेला त्याग, त्यांच्यावर झालेला परकोटीचा अन्याय, त्यांचं देशकार्य संपूर्ण जगाला कळावं, अशी गेले अनेक वर्ष खूप कळकळीची, तळमळीची इच्छा होती. आज या चित्रपटाच्या रुपाने सावरकर आणि त्यांचं ‘खरं’ कार्य, त्यांच्यावर झालेला अन्याय, हे सगळं संपूर्ण जगभरात अधिकाधिक पोहोचतंय याचा किती आनंद, अभिमान, समाधान वाटतंय काय सांगू. एका सावरकर भक्तासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. रणदीप हुड्डा तुम्ही जे केलंय त्यासाठी फक्त आभार पुरेसे नाहीत. कृतज्ञता. वंदे मातरम्…”

हेही वाचा – “आपला कोकण भारी आसा…”, मुग्धा वैशंपायन पहिल्यांदाच गेली काजूच्या बागेत, पोस्ट करत म्हणाली…

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात वीर सावरकरांची भूमिका रणदीप हुड्डाने साकारली आहे. तर अभिनेत्री अंकिता लोखंडे वीर सावरकरांच्या पत्नीच्या भूमिकेत झळकली आहे. चार दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८.९ कोटींची कमाई केली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mugdha vaishampayan reaction on randeep hooda swatantraveer savarkar movie pps